Join us

"शूटिंग खूप आधी झालं, कायदेशीर परवानग्या होत्या", 'अबीर गुलाल' बंदीवर वाणीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:11 IST

फवाद खानसोबत केलेल्या 'अबीर गुलाल' चित्रपटावर वाणीची प्रतिक्रिया

Vaani Kapoor On Abir Gulaal Ban: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर सध्या चर्चेत आहे. अलीकडेच वाणीची 'रेड २' ही फिल्म सुपरहिट ठरली आणि आता ती नेटफ्लिक्सवरील 'मंडाला मर्डर्स' या थरारपटातून ओटीटीवर पदार्पण करत आहे. ही फिल्म २५ जुलै २०२५ रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये सुरवीन चावलासुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशातच वाणीनं पाकिस्तानी कलाकार फवाद खानसोबत केलेल्या 'अबीर गुलाल' चित्रपटावर भाष्य केलं.

गेल्या २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली. फवाद खान असलेल्या वाणीच्या 'अबीर गुलाल' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली गेली होती. यावर प्रतिक्रिया देताना वाणी म्हणाली, "कोणाचाही हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. ही चित्रपट प्रेम पसरवण्यासाठी बनवला गेला होता, पण त्याला फक्त द्वेष मिळाला. शूटिंग खूप आधी झालं होतं, जेव्हा परिस्थिती वेगळी होती".

तिने पुढे स्पष्ट केलं की, "मेकर्सनी सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या होत्या आणि आम्ही देशाच्या भावना समजून घेतल्या आहेत. कुणीही कायद्याच्या विरोधात काही केलं नाही". दरम्यान, 'अबीर गुलाल'  सिनेमा ९मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार होता. या सिनेमात फवाद खान आणि वाणी कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. तर लीजा हेडन, सोनी राजदान, रिद्धी डोगरा, फरीदा जलाल, परमीत सौठी अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये झालं होतं.  

टॅग्स :वाणी कपूरपाकिस्तानफवाद खान