Join us

'रुस्तम'मधला तो सीन अन् अक्षय म्हणाला...उषा नाडकर्णींनी सांगितला खिलाडी कुमारचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:08 IST

शॉटट संपल्यानंतर अक्षय म्हणाला... उषा नाडकर्णींनी सांगितला अक्षयचा किस्सा

मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे कायम त्यांचं वेगळेपण दिसतं. ८० सालापासून त्या सतत काम करत आहेत. आज ७९ व्या वर्षीही त्यांचं काम सुरु आहे. उषा नाडकर्णी यांनी 'वास्तव', 'कृष्णा कॉटेज', 'वन टू थ्री', 'आर राजकुमार' या हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. अक्षय कुमारच्या 'रुस्तम'मध्येही त्या झळकल्या आहेत. नुकताच त्यांनी अक्षय कुमारसोबतचा (Akshay Kumar) अनुभव शेअर केला. 

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणाल्या, "अक्षय कुमारसोबत रुस्तम मध्ये काम केलं. पण मी काम करते म्हणजे जाऊन सगळ्यांना मिठ्या मारत नाही. मी उभी राहते, तुम्ही हसलात तर हसते. मिठ्या मारण्याची सवय नाही. रुस्तममध्ये जेलमधला सीन होता. आम्ही तिथे उभे होतो. माझ्याकडे इशारा करत अक्षयने टिनू देसाईला सांगितलं की मी यांच्यासोबत काम केलंय. मग म्हणाले,'नाही, नाही मी याच्यासोबत काम केलंय.' तो खूप छान आहे."

"नंतर आमचा शॉट झाल्यावर तो मला मोबाईलवर घरचे, पोरांचे फोटो दाखवत बसला होता. अक्षय अगदी आपल्यातला वाटतो. एकदा आम्ही पवित्र रिश्ताचं शूट करत होतो. तर तिथेच खाली त्याचं राऊडी राठोडचं शूट सुरु होतं. मला कळलं की तो खाली शूट करतोय. मी सेटवरच्या छोट्या मुलाला घेऊन खाली गेले आणि लांबूनच त्याचं शूट पाहत होते. अक्षयने मला पाहिलं. मी पुढे गेले. मला म्हणाला, 'क्या कर रही है इधर?' मी म्हणाले, 'माझं वरती शूट सुरु आहे'. मग त्यांचा मेकअप दादा गप्पा मारायला लागले. सगळे खूप चांगले आहेत."

टॅग्स :उषा नाडकर्णीअक्षय कुमारबॉलिवूडमराठी अभिनेता