Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्वशी रौतेलाच्या या पोस्टनंतर इंटरनेटवर गोंधळ, थेट फोन नंबरच झाला पोस्ट आणि मग.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 13:58 IST

नुकतीच उर्वशी काही गोष्टींमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिली. दरम्यान आता तर उर्वशीने चक्क फॅन्ससोबत आपला मोबाइल क्रमांक शेअर केला आहे.

फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला  सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. एरव्ही फक्त व्हिडीओ आणि फोटोंमुळे धुमाकुळ घालणारी उर्वशीने अतिउत्साहाच्या भरात असा काही फोटो शेअर केला की फोटो पाहून सोशल मीडियावर गोंधळ पाहायला मिळतोय. चाहतेही काहीसे संभ्रमातच आहेत.

 

ऑडीशन दरम्यानचा तिचा हा फोटो असावा. ज्यात ती एक बोर्ड हातात घेऊन उभी आहे. या बोर्डात बोल्डमध्ये लिहिलं आहे की- नवा वय आणि फोन नं नमुद केल्याचे पाहायला मिळतंय. मजेशीर बाब म्हणजे पाटीवर लिहीलेला नंबर हा फक्त ८ अंकाचा आहे त्यामुळे चाहते तिला तिच्या मोबाइल नंबरचे शेवटचे दोन नंबर विचारत आहे.

उर्वशीने तिच्या फॅशन सेन्स आणि सौंदर्याने बर्‍याच वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. उर्वशीने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.  बॉलिवूडची दिवा उर्वशी रौतेला बॉलिवूडची पहिली अभिनेत्री, अरब फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर म्हणून झळकली होती. अरब फॅशन वीकमध्ये प्रथमच बॉलिवूड अभिनेत्री म्हणून शोस्टॉपर बनण्याचा मान मिळाल्याने मला खरोखरच नशीबवाण समजते असे तिने म्हटले होते.  

हे जगातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित प्लॅटफॉर्म आहे. फॅशन वीक त्यापैकी एक आहे, माझ्या डिझायनर फुरणेआमातो याव्यतिरिक्त, ज्याने मला तिच्या डिझाइनसाठी निवडले आहे, ही माझ्यासाठी खरोखर खूप मोठी गोष्ट आहे तिने जेनिफर लोपेझ, एरियाना ग्रान्डे, बियॉन्से, मारीया केरी सारख्या बर्‍याच पॉप आयकॉन बरोबर काम केले आहे." 

वर्क फ्रंटवर उर्वशी रौतेला अखेर व्हर्जिन भानुप्रिया नावाच्या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसली होती. यात गौतम गुलाटी आणि अर्चना पूरन सिंग यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. उर्वशी सध्या तिच्या आगामी तेलगू चित्रपट “ब्लॅक रोझ” च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेला