Join us

उर्वशी रौतेलाने मुंबईत खरेदी केला 190 कोटींचा बंगला?, अभिनेत्रीच्या आईने सांगितलं या मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 18:16 IST

उर्वशीने जुहूमध्ये 190 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे आणि त्यात ती शिफ्ट झाली अशा बातम्या सगळीकडे आल्या होत्या.

Urvashi Rautela's Mother Slams Fake News:  मॉडेल-अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते आणि तिच्याशी संबंधित कोणत्या ना कोणत्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच उर्वशीने 190 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे आणि त्यात ती शिफ्टही झाली आहे. अशा बातम्या सगळीकडे आल्या होत्या. मात्र, ही बातमी खोटी ठरली आणि आता उर्वशीच्या आईने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या बातमीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उर्वशीची आई मीरा रौतेला यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका आर्टिकलचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यावर फेक लिहिले. या लेखात लिहिले होते- उर्वशी रौतेला तिच्या 190 कोटींच्या जुहूच्या घरात शिफ्ट झाली आहे. वाचा त्याच्या चार मजली बंगल्याची माहिती...

यावर मीरा रौतेला यांनी त्यांच्या पोस्टला कॅप्शन देत लिहिले - इंशाअल्लाह लवकरच असा दिवस येऊ देत.. आणि सर्व #न्यूज #चॅनेलच्या प्रार्थना स्वीकारल्या जाऊ देत.. आमीन

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील तिच्या लूकमुळे उर्वशी चर्चेत आली होती. तिने कान्समधील उर्वशीचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले होते. कान्समध्ये अभिनेत्रीने तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांची मनं जिंकली.  कान्समध्ये उर्वशी केवळ तिच्या लूकमुळेच नव्हे तर तिने परिधान केलेल्या मगरीच्या नेकलेसची ही चर्चा होती. 

टॅग्स :उर्वशी रौतेला