Join us

बाप रे बाप,उर्वशी रौतेलाचा स्टाईलचा जलवा, परिधान केलेल्या गाऊनची किंमत १५ कोटी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 15:23 IST

उर्वशी रौतेलाचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आताही उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे.

फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा.  आपल्या सौंदर्यासह हटके स्टाईलसाठी उर्वशी प्रसिद्ध आहे.

 

नेहमीच्या महागड्या गोष्टींमुळेच उर्वशी रौतेलाला ‘फॅशन दिवा’ म्हणून संबोधले जाते. ती बऱ्याचदा अशा सुपर हॉट आणि महागड्या फॅशनेबल लूकमध्ये दिसत असते.उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आताही उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे. 

 

उर्वशीने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. नुकतेच तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंपेक्षा तिच्या गाऊनच्या किंमतीमुळे तो गाऊनच चर्चेत आहे.  परिधान केलेल्या प्रिन्सेस गाऊनची किंमत काही हजारात किंवा लाखांत नसून थेट कोटींच्या घरात आहे. तेही एक नाही दोन नाही तर तब्बल २५ कोटींचा आकर्षक डिझायनर गाऊनची किंमत असल्याचे बोलले जात आहे. हा गाऊन बनवण्यासाठी १ वर्ष मेहनत घेतली गेल्याचेही बोलेले जात आहे.

कोणाला महागड्या गाड्यांची तर, काहींना महागड्या पर्सची आवड असते तसेच उर्वशीला महागड्या ड्रेसिंगची आवड असल्याचे पाहायला मिळते. ती जी काही स्टाइल करत त्यात काही ना काही खास बात असतेच असते. स्टाईलमध्ये राहणे उर्वशीसाठी खास नाही पण त्याची चर्चा होणे हेच तिच्यासाठी खास आहे. 

उर्वशीचे ‘वर्साचे बेबी’ हे गाणं चांगलंचं लोकप्रिय ठरत आहे. या गाण्यामध्ये उर्वशीच्या लुकने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्वशीने नेव्ही ब्ल्यू रंगाचा  ड्रेस  परिधान केला आहे. गाण्यासाठी दोन वेगवेगळ्या स्टायलिश गाऊनमध्ये ती दिसत आहे.  स्वतः डिझायनर दोनतिला वर्साचेने डिझाईन केले आहेत त्यामुळे त्याची किंमतही १५ कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे.

बॉलिवूडमध्ये नशीब अजमवल्यानंतर उर्वशी रौतेला आता तामीळ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.उर्वशीने चित्रपटासाठी तब्बल 10 कोटी रुपये घेतले आहेत. आणि त्यामुळेच उर्वशी तमिळ फिल्म इंडस्ट्रीची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. मध्यंतरी  चित्रपटाचं शूटींग हे मनालीत सुरू होते. 

टॅग्स :उर्वशी रौतेला