Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेगास्टार चिरंजीवीसोबत उर्वशी रौतेला करणार आयटम सॉंग, लवकरच चित्रीकरण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 18:29 IST

चिरंजीवी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अनेकांना असते. त्यातच उर्वशी रौतेलाचे नशीब उजळले असे म्हणावे लागेल.

तमिळ चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवीच्या आगामी सिनेमात बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. 'वॉल्टर वीरेय्या' या चित्रपटात अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे आयटम सॉंग आहे अशी माहिती मिळत आहे. चिरंजीवी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अनेकांना असते. त्यातच उर्वशी रौतेलाचे नशीब उजळले असे म्हणावे लागेल. हे गाणं प्रेक्षकांसाठी नक्कीच सरप्राईज असणार आहे. दिग्दर्शक बॉबी कोल्ली यांचा आगामी अॅक्शनपट वॉल्टर वीरेय्याची जोरदार चर्चा आहे. यामध्ये चिरंजीवी यांच्यासह रवी तेजा, अभिनेत्री श्रुती हसन देखील मुख्य भुमिकेत आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला लवकरच या खास गाण्याचे शूटिंग सुरु करणार आहे. चिरंजीवी आणि उर्वशीवर हे गाणे शूट होणार आहे. नुकतेच चिरंजीवी आणि रवी तेजा यांनी एकत्रित हैद्राबादमध्ये गाणे चित्रीत केले. या मल्टिस्टारर सिनेमाची चाहत्यांमधील उत्सुकता चांगलीच ताणली आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हा सिनेमाच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

सध्या उर्वशी तिच्या खाजगी आयुष्यातील गॉसिपमुळेच चर्चेत असते. तर बॉलिवूडमध्ये मात्र उर्वशीला अद्याप आपल्या अभिनयाची छाप पाडता आलेली नाही. 'सनम रे' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये पुलकित सम्राट आणि यामी गौतम मुख्य भुमिकेत होते.

टॅग्स :उर्वशी रौतेला