Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! उर्वशी रौतेलानं घातलेल्या ब्रेसलेटची किंमत वाचून व्हाल अवाक्, व्हिडीओ बघून म्हणाल -OMG!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 15:41 IST

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. उर्वशी आपल्या युनिक स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्वशी तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत उर्वशीने सोन्याचे हिऱ्याने सजवलेलेचे ब्रेसलेट घातले आहे. या व्हिडीओत ती हातातले ब्रेसलेट दाखवताना दिसतेय. एनडीटीव्ही इंडियाच्या रिपोर्टनुसार उर्वशीच्या या ब्रेसलेटची किंमत  70 लाख आहे. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर उर्वशी लवकरच बायोपिकमध्ये दिसणार आहे. 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सिरीजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डाची पत्नी पूनम मिश्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. थ्रिलर मालिका पोलिस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित आहे.सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला.

यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली होती. 2011 मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. याचवर्षी तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.  

टॅग्स :उर्वशी रौतेला