Join us

बाबो! उर्वशी रौतेलाने पार्टीमध्ये परिधान केला 32 लाखांचा ड्रेस, तयार करायला लागला इतका वेळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 15:02 IST

१५ मिनिटांच्या उपस्थितीसाठी ४ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासाठी चर्चेत राहणे काही नवीन नाही. कधी ती तिच्या महागड्या ड्रेसमुळे चर्चेत येते, तर कधी तिच्या भरमसाठ फीमुळे चर्चेत असते. अलीकडेच अशी बातमी समोर आली होती आहे की, दुबईतल्या पार्टीत उपस्थित राहण्यासाठी उर्वशीने चार कोटी रुपये घेतले. या पार्टीत तिने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत आतासमोर आली आहे.

31 डिसेंबरला न्यू इअर सेलिब्रेशनसाठी दुबईमध्ये एका पार्टीचे आयोजन केलं होते. यात अवघ्या 15 मिनिटांसाठी ती  उपस्थित राहिली होती. या पार्टीमध्ये उर्वशीने परिधान केलेल्या ड्रेसमुळे ती चर्चेत आली आहे. 

उर्वशीने परिधान केलेला हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर मायकेल सिन्कोने डिझाइन केला होता. उर्वशीच्या या गाऊनला तयार करण्यास संपूर्ण 150 तास लागले. मीडिया रिपोर्टनुसार या ड्रेसची किंमत 32 लाख रुपये होती. अभिनेत्रीने पहिल्यांदाच इतका महागड्या ड्रेस परिधान केलेला नाही. याआधी ही महागड्या ड्रेसमुळे उर्वशी चर्चेत आली होती. 

अभिनेत्री उर्वशी रौतेला बॉलिवूडची पहिली अभिनेत्री, अरब फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर म्हणून झळकली होती. आता उर्वशी लवकरच इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर उर्वशी सध्या तिच्या आगामी तेलगू चित्रपट ब्लॅक रोझच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

टॅग्स :उर्वशी रौतेला