Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बिकनीतील फोटो, फॅन्सने wow म्हणण्याऐवजी केले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 13:42 IST

या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बिकनीतील फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या फिगरचे कौतुक करण्यापेक्षा तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

ठळक मुद्देउर्वशीचा हा फोटो व्यवस्थितपणे पाहिला तर तिच्या पायावर हाताचा ठसा पाहायला मिळत आहे. हा हाताचा ठसा कोणाचा आहे असे विचारत तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या व्हेकेशनचे, आपल्या खाजगी जीवनातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि या फोटोंना त्यांच्या चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळतो. पण एका अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बिकनीतील फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या फिगरचे कौतुक करण्यापेक्षा तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अधिक चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करण्याची एकही संधी ती सोडत नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

उर्वशी रौतेला सध्या मालदिवला फिरायला गेली असून तिने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोत ती बिकनीत दिसत असून या फोटोवर काहीजणांनी तू खूपच छान दिसत असल्याचे म्हटले आहे. पण काहींनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. उर्वशीचा हा फोटो व्यवस्थितपणे पाहिला तर तिच्या पायावर हाताचा ठसा पाहायला मिळत आहे. हा हाताचा ठसा कोणाचा आहे असे विचारत तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी उर्वशी रौतेला दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत पाय रोवण्याचे प्रयत्न करतेय. पण अद्याप तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘पागलपंती’ हा सिनेमा रिलीज झाला. २०११ मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. सिंह साहब - द ग्रेट या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये उर्वशी दिसली. भाग जानी, सनम रे अशा चित्रपटात देखील तिने काम केले आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेला