Join us

सेल्फी घेण्यासाठी पुढे सरसावल्या चाहत्यांचे उर्वशी रौतेलाने हिसकावून घेतले फोन, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:14 IST

Urvashi Rautela : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतीच दुबईतील एका मोठ्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या उर्वशीने एक अशी मजेशीर गोष्ट केली, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतीच दुबईतील एका मोठ्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या उर्वशीने एक अशी मजेशीर गोष्ट केली, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. तिचा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि विशेष म्हणजे हा व्हिडीओ अभिनेत्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

SIIMA अवॉर्ड्स २०२५ कार्यक्रमादरम्यान, तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते, पण जेव्हा तिने चाहत्यांचे फोन हिसकावून घेण्यास सुरुवात केली, तेव्हा तिथे उपस्थित लोक हैराण झाले. हा व्हिडीओ स्वतः उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे आणि आता तो वेगाने व्हायरल होत आहे.

या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, चाहते याला 'आजवरचा सर्वात दुबई मोमेंट' म्हणत आहेत. 'फक्त उर्वशीच फोन हिसकावून घेण्याच्या क्षणाला आयकॉनिक बनवू शकते' आणि 'ती नेहमीप्रमाणेच शांत आणि सुंदर आहे' अशा कमेंट्स व्हिडीओंवर पाहायला मिळत आहे. काही तासांतच हा व्हिडीओ जगभरात ट्रेंड झाला, हे सिद्ध झाले की उर्वशीला अनपेक्षित घटनांनाही शोस्टॉपर मोमेंटमध्ये कसे बदलावे हे चांगलेच माहीत आहे. 

तेलुगूतल्या तीन सुपरस्टार्ससोबत उर्वशीनं केलंय काम

उर्वशीचा सिनेइंडस्ट्रीतला प्रवास आणखी खास आहे, कारण ती तेलुगू सिनेमातील तीन सुपरस्टार्स - पवन कल्याण, चिरंजीवी आणि बालकृष्ण यांच्यासोबत काम करणारी एकमेव अभिनेत्री आहे. या दुर्मिळ यशामुळे तिची 'पॅन-इंडियन' स्टार म्हणून ओळख अधिक मजबूत झाली आहे, जी वेगवेगळ्या इंडस्ट्रींमध्ये आपल्या कामामुळे लोकांची मने जिंकत आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेला