Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पांड्या अन् त्या व्हिडीओमुळे वैतागली उर्वशी रौतेला; म्हणे, मलाही कुटुंब आहे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 10:18 IST

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे अनेक बोल्ड फोटो व व्हिडीओ ती शेअर करते. पण सध्या हीच उर्वशी संतापली आहे.

ठळक मुद्देउर्वशीच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘पागलपंती’ या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे अनेक बोल्ड फोटो व व्हिडीओ ती शेअर करते. पण सध्या हीच उर्वशी संतापली आहे. होय, तिची ताजी पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला याचा अंदाज येईल. उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका व्हिडीओचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉट एका बातमीचा आहे. होय, उर्वशीने तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डकडे मदत मागितली, असे यावर लिहिले आहे. आता उर्वशीचा हा एक्स-बॉयफ्रेन्ड कोण आणि हा मामला काय, हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला अख्खी बातमी वाचावी लागेल.

उर्वशीचा हा एक्स-बॉयफ्रेन्ड म्हणजे दुसरा कुणी नसून क्रिकेटपटू हार्दिक पांड्या. 2018 मध्ये उर्वशी व हार्दिक पांड्याच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान याच हार्दिक पांड्याला उर्वशीने मॅचचा फ्री पास अरेंज करण्यासाठी सांगितले होते. पण हार्दिकने उर्वशीला जराही भाव दिला नाही आणि पास अरेंज न झाल्यामुळे उर्वशी वर्ल्ड कप मॅच पाहू शकली नाही, अशी बातमी मध्यंतरी आली होती. याच पार्श्वभूमीवरचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. याच व्हिडीओमुळे उर्वशी संतापली आहे.

‘या व्हिडीओसाठी जो कुणी जबाबदार मीडिया चॅनल आहे, त्याने कृपा करून असे व्हिडीओ यु ट्यूबवर अपलोड करणे बंद करावे. माझेही कुटुंब आहे. मलाही त्यांना उत्तर द्यावे लागते. असे व्हिडीओ माझ्यासाठी अडचणीचे ठरतात,’ अशा शब्दांत उर्वशीने आपला राग व्यक्त केला आहे. 

तत्पूर्वी हार्दिक पांड्याला फ्री पास अरेंज करण्यास सांगितल्याची बातमी उर्वशीने धुडकावून लावली होती. मी कुणालाही  फ्री पास अरेंज करण्यास सांगितलेले नाही. या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. माझ्या एक्स-मॅनेजरने या असल्या बातम्या पेरल्या. नोकरीवरून काढून टाकल्यानंतर मला बदनाम करण्यासाठी तो अशा बातम्या पेरतो आहे, असे उर्वशीने अलीकडे म्हटले होते.

उर्वशीच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘पागलपंती’ या चित्रपटात दिसणार आहे. अनीस अज्मी दिग्दर्शित या मल्टिस्टारर चित्रपटात जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेलाहार्दिक पांड्या