Join us

VIDEO: ५५ लाखांचा लेहंगा घालून फोटोशूट करताना उर्वशी रौतेलाचा गेला तोल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 18:10 IST

उर्वशी तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता उर्वशी तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. ज्यात ती प्रसिद्ध पंजाबी गायिका जस मानकसोबत फोटोशूटसाठी पोज देताना दिसते आहे. फोटोशूट सुरु असताना अचानक उर्वशीचा तोल जातो आणि ती खाली बसते. उर्वशी रौतेलाना या व्हिडिओ  55 लाखांचा लेहंगा परिधान केला आहे.

उर्वशीचा हा व्हिडीओ नेहा कक्करच्या लग्नाच्या वेळेचा आहे. उर्वशीने हाच 55 लाखांचा लेहंगा घालून गायिका नेहा कक्करच्या लग्नात हजेरी लावली होती. उर्वशी  मानकसोबत एका आराम खुर्चीवर बसून फोटो काढत होती. तेवढ्यात तिचा लेहंग्यामध्ये  पाय अडकला अन् तिचा तोल गेला. 

2011 मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. याचवर्षी तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली.

टॅग्स :उर्वशी रौतेला