Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन दरम्यान उर्वशी रौतेलाने फॅन्सला दिले वर्कआऊट चॅलेंज, फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 15:27 IST

इन्स्टाग्रामवर तिने एक व्हि़डीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. बऱ्याचदा तिला फोटो व व्हिडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यातही ती ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल देखील सुनावते. सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व सेलिब्रेटींप्रमाणे अभिनेत्री उर्वशी रौतेलादेखील क्वारंटाईनमध्ये आहे. पण तरीदेखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. आता तिने चाहत्यांंना वर्कआऊट चॅलेंज दिला आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हि़डीओ शेअर केला आहे. या  व्हिडीओसोबत उर्वशीने कॅप्शन लिहिले आहे, एकाग्रता! प्रेरणा ! समर्पण! हे कोणतेही निमित्त नाही आहे, क्वारांटाईन दरम्यान #बॉडीबायउर्वशी चॅलेंज! मला आशा आहे की यावेळी प्रत्येकजण निरोगी आणि स्वस्थ आहे, सुरक्षित रहा. "

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे.

सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. याशिवाय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. रॅपर हनी सिंगच्या लव डोस गाण्यातही ती दिसली आहे. भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या पागलपंती मल्टीस्टारर सिनेमातही तिनं काम केलं आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेला