उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उर्वशी कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनयाबरोबरच उर्वशीच्या बोल्डनेसचीही कायम चर्चा होताना दिसते. नुकतंच उर्वशीने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. उर्वशीने नुकतीच रोल्स रॉयस कंपनीची आलिशान गाडी खरेदी केली आहे.
उर्वशीने खरेदी केलेल्या या आलिशान गाडीची किंमत सुमारे १२ कोटींच्या घरात आहे. तिने प्रीमियम एसयूवी रोल्स रॉयस कलिनन ही गाडी घेतली आहे. बॉलिवूडमधील कोणत्याच अभिनेत्रीकडे ही गाडी नाही. ही गाडी खरेदी करणारी उर्वशी पहिली अभिनेत्री ठरली आहे. याबरोबरच इन्स्टाग्रामच्या फोर्ब्स रिच लिस्टमध्येही उर्वशीने स्थान मिळवलं आहे.
अंबानी, शाहरुख खानकडे आहे ही कार!
रोल्स रॉयस कंपनीची ही गाडी बॉलिवूडमध्येही काही मोजक्या सेलिब्रिटींकडे आहे. शाहरुख खान, विवेक ओबेरॉय, अजय देवगण आणि अल्लू अर्जुनकडे ही कार आहे. त्याबरोबरच मुकेश अंबानींकडेदेखील ही रोल्स रॉयस कार आहे.