Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो..! उर्वशी रौतेला आणि गुरू रंधावा दिसणार लिप लॉक करताना, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 18:14 IST

काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने गुरू रंधावासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गुरु रंधावा सोबत आगामी म्युझिक व्हिडिओ अल्बम "डूब गये"मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने गुरू रंधावासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर त्यांचे अफेयर आहे की काय, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर समजले की सर्व काही त्यांच्या आगामी म्युझिक अल्बम डूब गयेच्या शूटिंगदरम्यानचे फोटो आहेत. दरम्यान आता समजते आहे की या गाण्यात उर्वशी आणि गुरू रंधावा लिपलॉक करताना दिसणार आहे. डुब गये या गाण्याचे दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी रेमो डिसूझाने केली असून बी- प्राकने लिहिले आहे. 

उर्वशी रौतेला सातत्याने डुब गये या गाण्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते आहे. त्यामुळे या गाण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला आणि गुरू रंधावा फक्त रोमांसच नाही तर लिपलॉक करताना दिसणार आहेत. 

उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती इंस्पेक्टर अविनाश या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. सध्या ती या सीरिजचे शूटिंग करते आहे. यात तिच्यासोबत रणदीप हुडा दिसणार आहे.

याशिवाय ती द्विभाषिक थ्रिलट सिनेमा ब्लॅक रोझ आणि तिरुत्तू पायले २च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. याशिवाय ती इजिप्त्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत एका इंटरनॅशनल म्युझिक व्हिडीओ वार्साचेमध्ये झळकणार आहे

टॅग्स :उर्वशी रौतेला