Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ? उर्मिला मातोंडकर यांचा कंगनाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 17:13 IST

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली, तेव्हाचा वाद, त्यावरून शिवसेनेची रंगलेला तिचा ‘सामना’ अगदी सगळे काही ताजे ताजे असताना कालपरवा कंगना मुंबईत दाखल झाली.

ठळक मुद्देकंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दांत अतिशय बोचरी टीका केली होती.   मुंबईला  पाकव्याप्त काश्मीर म्हणणा-या कंगनाला त्यावेळी अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.

नुकत्याच शिवसेनेत आलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना राणौतला जोरदार टोला लगावला आहे. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असे खोचक ट्वीट त्यांनी केले आहे. कारण काय तर कंगनाचे मुंबईबद्दलचे अचानक उफाळून आलेले प्रेम.मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली, तेव्हाचा वाद, त्यावरून शिवसेनेची रंगलेला तिचा ‘सामना’ अगदी सगळे काही ताजे ताजे असताना कालपरवा कंगना मुंबईत दाखल झाली. म्हणायला झेड सिक्युरिटी नव्हती. पण बाईचा तोरा तोच होता. मुंबईत दाखल होताच कंगनाने काय करावे तर, ती सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचली. इतकेच नाही तर मंदिराच्या बाहेर येताच, अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

‘मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त बाप्पाची परवानगी तेवढी हवी. ती मिळाली आहे,’ असे ती म्हणाली. इतकेच नाही तर ‘माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे मला कितीतरी शत्रूंचा सामना करावा लागला. मी आज मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आता मला सुरक्षित वाटतेय,’ असे ती म्हणाली.  तिच्या याच वक्तव्यावर अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार टोला लगावला.

 ‘माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असे खोचक ट्वीट उर्मिला यांनी केले.काही दिवसांपूर्वी कंगना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता.

कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दांत अतिशय बोचरी टीका केली होती.   मुंबईला  पाकव्याप्त काश्मीर म्हणणा-या कंगनाला त्यावेळी अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हा रोष पाहता गेल्या वेळी कंगना मुंबईत आली होती तेव्हा तिच्यासाठी झेड सिक्युरिटी देण्यात आली होती. मात्र यावेळी तिची झेड सिक्युरिटी काढून घेण्यात आली होती.

टॅग्स :कंगना राणौतउर्मिला मातोंडकर