Join us

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कौटुंबिक वादात उर्फी जावेदची उडी, नवाजच्या पत्नीचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 09:05 IST

काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. भाई, पत्नी या जवळच्या लोकांनीच त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी आलियाने (Aliya Siddiqui) नुकताच एक व्हिडिओ शेअर करत तिची आणि मुलांची झालेली वाईट अवस्था दाखवली. नवाजने घरात घेतलं नसल्याचं तिने सांगितलं तर तिने नवाजवर बलात्काराचाही आरोप केला आहे. आलिया सिद्दीकीची अशी अवस्था बघून सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदनेही (Urfi Javed) प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी देखील खूप वाईट काळातून गेली होती ते दिवस तिला आठवलेत.

काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यामध्ये आलिया तिच्या दोन्ही मुलांसह रस्त्यावर उभी आहे आणि त्यांना घरात घेतलं जात नाही. उर्फीने हाच व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यात तिने लिहिले, 'काहीच बोलू शकत नाहीए. खूप वाईट वाटतंय. मला माझ्या वाईट दिवसांची आठवण झाली. केवळ सहानुभुती.'

nawazuddin siddiqui ने मध्यरात्री काढलं पत्नी अन् मुलांना घराबाहेर; Video पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट

अशी पोस्ट शेअर करत उर्फी आलियाच्या दु:खात सहभागी झाली आहे. उर्फीला तिचे वडील कायम शिवीगाळ करायचे, तिचं शोषण करायचे तर आईलाही मारहाण करायचे. तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.  असा धक्कादायक खुलासा तिने काही दिवसांपूर्वीच केला होता. आलिया सिद्दीकीची अवस्था पाहून याच दिवसांची आठवण झाल्याचं उर्फीने म्हणलं आहे. 

टॅग्स :उर्फी जावेदनवाझुद्दीन सिद्दीकीसोशल मीडिया