Join us
Daily Top 2Weekly Top 5

Uorfi Javed : दिलदार! उर्फी जावेदने 95 वर्षीय व्यक्तीला केली आर्थिक मदत; दर महिन्याला वृद्धाला देणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 16:47 IST

Uorfi Javed : काही दिवसांपूर्वी उर्फीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका 95 वर्षीय व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला होता. 

आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद अनेकदा सामाजिक प्रश्नांवरही आवाज उठवताना दिसते. ती अनेकदा तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करण्यात पुढाकार घेते. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा घडली असून उर्फीचा दिलदारपणा पाहायला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका 95 वर्षीय व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला होता. 

उर्फीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती स्वतःचं पोट भरण्यासाठी ड्रम वाजवताना दिसत आहे. हे पाहून उर्फी खूप भावूक झाली. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करून तिने लिहिले की, "कोणीतरी यांचा नंबर किंवा पत्ता द्यावा." यानंतर उर्फीने वृद्ध व्यक्तीची माहिती मिळताच आर्थिक मदत केली आणि दर महिन्याला काही रक्कम वृद्धाला देण्याचे आश्वासनही दिले आहे. 

इतकंच नाही तर उर्फीने इन्स्टाग्राम पेजचेही आभार मानले ज्यामुळे ती वृद्धाशी संपर्क साधू शकली. इन्स्टाग्रामवरील एका व्यक्तीने वृद्धाला मदत केल्याबद्दल उर्फीचे आभार मानले आणि तिच्यासारख्या दयाळू लोकांना तिला पाठिंबा देण्यास सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका मुलाखतीत उर्फीला जेव्हा प्रेमाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. 

उर्फीने पैशांसाठी प्रेमाला मारली लाथ; 'असं' काही म्हणाली जे ऐकून पोरांना आला प्रचंड राग

एक काळ असा होता जेव्हा ती खूप रोमँटिक होती. ती खूप लवकर सर्वांच्याच प्रेमात पडायची, पण आता ती परिस्थिती बदलली आहे. उर्फीला आता प्रेमात अजिबात रस नाही कारण आता तिच्याकडे पैसे आहेत. आधी तिच्याकडे भरपूर मोकळा वेळ होता, पण आता खूप काम आहे. उर्फीची ही गोष्ट लोकांना अजिबात आवडलेली नाही. लोक म्हणतात की, उर्फीसाठी फक्त पैसा महत्त्वाचा आहे. पैशांसाठी ती काहीही करू शकते. 

टॅग्स :उर्फी जावेदबॉलिवूड