शकीलाला साऊथच्या अॅडल्ट चित्रपटांची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आज तिचा वाढदिवस आहे. शकीलाने आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतारा पाहिले आहेत. शकीलाचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. कधी काळी आईने पैशासाठी शकीलाला वैश्या व्यवसायात ढकलले होते. शकीलाचे शिक्षण फक्त सहावीपर्यंतच झाले होते. शकीलने वयाच्या 20 व्या वर्षी सॉफ्ट पोर्न सिनेमा 'प्लेगर्ल'मधून करिअरला सुरुवात केली. यात शकीलाने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. शकीला मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.
2000 साली आलेला मल्याळम सिनेमा शकीलासाठी टर्निंग पॉईंट ठरला. या ‘किन्नर थुंबिकल’ या सिनेमानंतर लोक शकीलाला ओळखू लागले. मात्र बोल्ड अभिनेत्री म्हणूनच. आजपर्यत शकीलाने 250 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे.