Join us

मुलगा गोरा अन् लेक सावळी, रंगावरुन तुलना करणाऱ्यांना ट्विंकल खन्नाचं चोख उत्तर, म्हणाली- "आपल्या देशात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:49 IST

अक्षय आणि ट्विंकलच्या मुलांची त्यांच्या रंगावरुन तुलना केली जाते. यावर पहिल्यांदाच भाष्य करत ट्विंकल खन्नाने टिकाकारांना चोख उत्तर दिलं आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे लोकप्रिय कपल आहे. २००१ मध्ये त्यांनी लग्न करत संसार थाटला. अक्षय आणि ट्विंकलला आरव आणि नितारा ही दोन मुलं आहेत. पण, त्यांनी दोन्ही मुलांना सोशल मीडियापासून थोडं लांबच ठेवणं पसंत केलं आहे. अनेकदा अक्षय आणि ट्विंकलच्या मुलांची त्यांच्या रंगावरुन तुलना केली जाते. यावर पहिल्यांदाच भाष्य करत ट्विंकल खन्नाने टिकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. 

FICCI FLO ला दिलेल्या मुलाखतीत ट्विंकल खन्नाने मुलाग आरव आणि मुलगी नितारा यांची अनेकदा रंगावरुन तुलना केली जाते असं म्हटलं. ती म्हणाली, "मी माझ्या पहिल्या मुलामुळे खूप काही शिकले. तुम्ही तुमच्या पहिल्या बाळाबरोबर खूप काही गोष्टी करून बघता. माझ्या दुसऱ्या बाळाच्या वेळी म्हणजे मुलीच्या वेळी मला हे जाणवलं की ती एक नॉर्मल भारतीय मुलीसारखी दिसते. नेहमी तिच्या आणि तिच्या भावाच्या रंगाबाबत तुलना होणार. आपल्या देशात या गोष्टी होत असतात".

"त्यानंतर मी हे ठरवलं की तिने स्वत:ला अद्भुत समजलं पाहिजे. मी तिला म्हटलं की तू खूप सुंदर आहे. फ्रिदा कालोसारखीच तूदेखील शानदार आहेस. ती सावळी आहे पण मी तिला तुझा रंग गोल्डन आहे असं सांगते", असं ट्विंकल खन्नाने सांगितलं. पुढे तिने लेकीचा एक किस्साही या मुलाखतीत सांगितला.  ती म्हणाली, "मला माझ्या मुलीवर खूप गर्व आहे. एकदा ती तिच्या भावासोबत समुद्रकिनारी बसली होती. आरव तिचं उन्हापासून रक्षण करत होता. ती त्याला म्हणाली की मला याची गरज नाही. माझी त्वचा तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहे. पांढरा टीशर्ट खराब होतो पण ब्राऊन नाही". 

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमारसेलिब्रिटी