Join us  

हे काय? ट्विंकल खन्नाच्या कानात ‘कांद्याचे झुमके’, अक्षयने दिले गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 10:03 AM

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

ठळक मुद्दे फोटोमध्ये या झुमक्यातील एका कांद्याला कोंब आलेला दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. कारण काय तर तिच्या कानातील कांद्याचे झुमके. आश्चर्य वाटले ना, पण हे खरेखुरे कांदे आहेत. कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना ट्विंकलने कांद्याचे झुमके घातले आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेत. पती अक्षय कुमारने तिला हे कांद्याचे झुमके तिला भेट म्हणून दिले.

ट्विंकलने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने हे झुमके कानात घातलेले दिसत आहेत. ‘ एका शूटनंतर दुसरे शूट... पण   तू ही मौल्यवान भेटवस्तू माझ्यासाठी आणलीस, त्याचा मला आनंद आहे. कांद्याला कोंब येण्याआधी ते घालण्याची संधी मला मिळाली’, असे तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

 ‘माझा नवरा ‘द कपिल शर्मा शो’चे शूटिंग पूर्ण करुन हे झुमके घरी आला. त्या लोकांनी हे झुमके लोक करिनाला दाखवत होते. पण ती यामुळे फार काही इंप्रेस झाली नाही. पण मला वाटलं तुला हे नक्कीच आवडतील. म्हणून मी तुज्यासाठी हे घेऊन आलो, असे तो मला म्हणाला. कधी कधी अनेक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद देऊन जातात,’ असेही तिने हे फोटो पोस्ट करताना लिहिले.

कांद्याच्या वाढत्या भावामुळे सामान्य माणसाचे बजेट बिघडले आहे. देशाच्या अनेक भागांत कांद्याच्या भावाने शंभरी गाठली आहे. अशात ट्विंकलने घातलेल्या या कांद्याची चर्चा होणार नाही तर नवल. 

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमार