Join us

"अक्षय आणि मी स्वतंत्र आहोत..." नेमकं काय म्हणाली ट्विंकल खन्ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 09:45 IST

गेल्या काही वर्षात अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फार यश मिळालं नाहीये. त्यामुळं तो एका हिटच्या प्रतिक्षेत होता. ...

गेल्या काही वर्षात अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फार यश मिळालं नाहीये. त्यामुळं तो एका हिटच्या प्रतिक्षेत होता. 'स्कॉय फोर्स'  सिनेमाकडून त्याला प्रचंड अपेक्षाही होत्या. नुकताच त्याचा हा सिनेमा प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती.  बऱ्याच प्रतीक्षेनंतर अक्षय कुमारला बॉक्स ऑफिसवर यश मिळत असल्याचं दिसतं आहे. चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त अक्षय वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. 

अभिनेत्याची पत्नी ट्विंकल खन्ना अभिनयाच्या दुनियेपासून दूर असली, तरी एक लेखिका म्हणून लोकांशी जोडलेली राहते. अक्षय कुमारने गेल्या वर्षी एका मुलाखतीत तो उजव्या विचारसरणीचा आणि ट्विंकल डाव्या विचारसरणीचा विचार करते, असे म्हटले होते. आता ट्विंकलनं अक्षयसोबत राजकीय विचारसरणीतील मतभेदांबद्दल भाष्य केलं. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका खास स्तंभात, ट्विंकलने अनेक मुद्दे मांडली. तिनं लिहलं, "आम्ही स्वतंत्र व्यक्तीमत्व आहोत. आमची वेगवेगळी विचारसरणी असू शकते".

एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी असल्यामुळे काय वाटते, असे जे प्रश्न तिला विचारण्यात येतात, यावर तिने नाराजी व्यक्त केली. तिनं लिहलं, "मी जेव्हा जेव्हा कोणत्याही मुलाखतीसाठी बसते, तेव्हा मला विचारलं जातं की स्टार पत्नी असल्याबद्दल मला कसं वाटतं. पण, मी शांतपणे उत्तर देते. मला वाटत नाही की स्टार पत्नी असं काही असतं". यासोबतच अभिनेत्रीनं विविध कारणांसाठी महिलांना कसं जबाबदार ठरवलं जात, याबद्दलही भाष्य केलं. विराट कोहलीच्या खराब खेळासाठी अनुष्का शर्माला कसे जबाबदार धरले होते, मेलानिया ट्रम्प यांच्यावर त्यांच्या पतीच्या धोरणांसाठी टीका केली होती ही काही उदाहरणे अभिनेत्रीने दिली.

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्ना