काल मदर्स डे निमित्ता बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आईसोबतचे फोटो शेअर केलेत. ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) त्यापैकीच एक. ट्विंकलने आई डिंपलसोबतचा फोटो शेअर केला. पण या फोटोची किंबहुना या पोस्टची वेगळ्याच कारणाने चर्चा रंगली. होय, ट्विंकलच्या या पोस्टवर एका युजरने प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचे उत्तर देताना ट्विंकल खुद्द पती अक्षय कुमारचीच (Akshay Kumar) मजा घेताना दिसली.ट्विंकलने शेअर केलेला फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट होता. यात ती आणि तिची आई डिंपल (Dimple Kapadia) आपआपल्या कामात बिझी आहेत.
‘सद्यपरिस्थितीत आम्ही मदर्स डे अगदी मस्त साजरा केला. आम्हा दोघींचेही हात रिकामे राहू शकत नाही. आई स्केचिंग करतेय आणि मी माझे एम्ब्रॉडरी वर्क करतेय शिवाय सोबत सोबत मस्तपैकी गप्पा सुरू आहेत. हॅपी मदर्स डे,’ या कॅप्शनसह ट्विंकलने हा फोटो शेअर केला.या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला नसेल तर नवल. एका चाहत्याने मात्र या फोटोवर कमेंट करताना एक वेगळाच प्रश्न विचारला. असले फोटो तू क्लिक कशी करतेस? असे फोटो क्लिक करण्यासाठी तुझ्याकडे एखादे खास डिव्हाइस आहे का? असे त्याने विचारले. आता ट्विंकल या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असे कसे होणार. यावर तिने चांगलेच मजेशीर उत्तर दिले.‘हाहाहा, माझ्याकडे नवरा आहे, जो असे फोटो क्लिक करतो. दुस-या शब्दांत सांगायचे तर हो, माझ्याकडे हे एक खास डिव्हाइस आहे,’ असे उत्तर तिने दिले.