Join us

इथून पुढे प्रियंका चोप्रासोबत काम करायचं नाही, अक्षय कुमारला पत्नी ट्विंकल खन्नाकडून मिळाली होती सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 13:15 IST

अक्षय कुमारचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

अक्षय कुमारचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. या लिस्टमध्ये शिल्पा शेट्टी, रवीना टंडन आणि आयशा जुल्काचे नाव सामिल आहे. शेवटी त्याने ट्विंकल खनासोबत लग्न केले. एकदा प्रियंका चोप्रासोबत देखील अक्षय कुमारचे नाव जोडले गेले होते. दोघांनी काही सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. प्रियंका आणि अक्षयने पहिल्यांदा 'अंदाज' सिनेमात एकत्र झळकले होते. मग दोघांच्या जोडीने वक्त हा हिट सिनेमा दिला होता. दोघांच्या ऑफस्क्रिन अफेअरची चर्चा खूप रंगली होती. 

ट्विंकल खानने अक्षयकुमाराला प्रियंकापासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र या गोष्टीचा अक्षयवर फारसा असर पडला नाही. मग ट्विंकल थेट प्रियंकाशीच बोलली. फोन कॉलवर दोघांमध्ये जबरदस्त भांडण झाले. ऐतराज सिनेमातील अक्षय आणि प्रियंकाच्या केमिस्ट्रीची चर्चा झाली. दोघांनी यात इंटिमेट सीन्स दिले होते. चाहत्यांमध्ये दोघांचे अफेअर असल्याची चर्चा रंगली. यावेळी अक्षय कुमारचे ट्विंकल खनासोबत लग्न होऊन दोन मुलं होती. अक्षय आणि प्रियंकाच्या अफेअरचे पडसाद अक्षयच्या संसारवर उमटायला लागले. शेवटी ट्विंकलने अक्षय कुमारला शपथ देऊन प्रियंकासोबत काम न करण्यास सांगितले. त्यानंतर अक्षयने कधीच प्रियंकासोबत काम केले नाही. 

सध्या अक्षय तिच्या आगामी सिनेमा लक्ष्मी बॉम्बच्या ट्रेलरला घेऊन चर्चेत आहे. काल(शुक्रवारी) लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर रिलीज झाला आहे.  अक्षय कुमार करिअरमध्ये पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे.

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्नाप्रियंका चोप्रा