Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक आर्यनच्या 'आशिकी 3'मधून तृप्ती डिमरी Out, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:29 IST

'आशिकी 3'मध्ये रोमान्ससोबतच भरपूर ड्रामा पाहायला मिळणार आहे.  

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. Bhool Bhulaiyaa 3 सिनेमानंतर कार्तिक 'आशिकी 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सिनेमात कार्तिकसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भुमिकेत झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता 'आशिकी 3'मधून तृप्ती डिमरीला काढण्यात आलं आहे. तर तिच्या जागी एका मराठमोळ्या अभिनत्रीची वर्णी लागली आहे. 

कार्तिक आर्यन सध्या दिग्दर्शकांची पहिली पसंती आहे. नुकताच त्याच्या 'भूल भुलैया 3' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत तृप्ती डिमरी झळकली होती.  हीच जोडी पुन्हा अनुराग बसूच्या  'आशिकी 3'मध्ये झळकणार होती. पण, आता तृप्ती डिमरीची जागा शर्वरी वाघने घेतल्याचे समोर आले आहे. शर्वरी पहिल्यांदाच कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. thelallantop याबाबत वृत्त दिलं आहे.  

अनुराग बासूच्या या चित्रपटात रोमान्ससोबतच भरपूर ड्रामा पाहायला मिळणार आहे.  या सिनेमात नवी फ्रेश जोडी दाखवण्याची इच्छा दिग्दर्शकाची असल्याने तृप्तीला चित्रपटातून काढण्यात आलं. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणार आहे. दोन्ही स्टार्स या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान, शर्वरी वाघ YRF स्पाय युनिव्हर्सचा पुढचा चित्रपट 'अल्फा' मध्ये आलिया भट्टसोबत मुख्य भूमिकेत आहे. चित्रात बॉबी देओल खलनायक झाला आहे. तर दोन्ही महिला हेर त्याच्याशी भिडताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.  

टॅग्स :तृप्ती डिमरीकार्तिक आर्यनबॉलिवूडसेलिब्रिटी