Join us

 दीप्ती नवल यांची अधुरी प्रेमकहाणी; साखरपुडा झाला पण नाही होऊ शकले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 08:00 IST

ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांचा आज वाढदिवस

ठळक मुद्देसध्या त्या मनोरूग्णांसाठी काम करत आहेत.

चश्मे बद्दूर  आणि  श्रीमान श्रीमती  यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांचा आज वाढदिवस. आपल्या तीन दशकांच्या प्रदीर्घ करिअरमध्ये दीप्ती यांनी अनेक यादगार सिनेमे दिलेत. पण आज आम्ही दीप्ती यांच्या चित्रपटांबद्दल नाही तर त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

होय, या अभिनेत्रीवर यश, पैसा, प्रसिद्धीची बरसात झाली पण खासगी आयुष्यात मात्र ती कायम एकाकी राहली. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबत दीप्तींनी लग्न केले. पण 17 वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर दीप्ती आयुष्यात एकाकी पडल्या. यादरम्यान त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. पण आयुष्यातील जोडीदाराची उणीव त्यांना भासू लागली. आयुष्याच्या या वळणावर त्यांच्या आयुष्यात एका व्यक्तीची एन्ट्री झाली. होय, सुप्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचा पुतण्या व अभिनेते विनोद पंडित यांच्या रूपात दीप्तींना नवे प्रेम मिळाले. दीप्ती भावी आयुष्याची स्वप्नं रंगवू लागल्या. बघता बघता दीप्ती व विनोद पंडित यांचा साखरपुडाही झाला. पण लग्न कदाचित नियतीला मंजुर नसावे. एकीकडे लग्न ठरले आणि दुसरीकडे विनोद पंडित यांचे कर्करोगाने निधन झाले.

विनोद पंडित यांच्या निधनाने दीप्ती पुन्हा एकाकी पडल्या. नियतीचा हा क्रूर खेळ पाहून आतून उन्मळून पडल्या. पण कालांतराने त्यांनी स्वत:ला सांभाळले आणि पुन्हा अ‍ॅक्टिंगकडे वळल्या. विनोद पंडित यांच्या निधनानंतर दीप्तींनी लग्न केले नाही. आजही त्या एकाकी आयुष्य जगत आहेत.

सध्या त्या मनोरूग्णांसाठी काम करत आहेत. मुलींच्या शिक्षणासाठीही त्या कार्य करत आहेत. याशिवाय विनोद पंडित यांच्या नावाने असलेल्या ‘विनोद पंडित चॅरिटेबल ट्रस्ट’शी जुळलेल्या आहेत. कवयित्री, चित्रकार आणि फोटोग्राफर अशीही त्यांची ओळख आहे.

टॅग्स :बॉलिवूड