Join us

फिटनेस फ्रिक असलेला टायगर श्रॉफ एकेकाळी होता लठ्ठ?; पाहा मग हा video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:11 IST

Tiger shroff: टायगरने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो प्रचंड जाड दिसत असून अनेक जण थक्क झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) उत्तम अभिनयासह त्याच्या फिटनेससाठीदेखील ओळखला जातो. त्यामुळेच आज असंख्य जण त्याच्या फिटनेसमुळे त्याला फॉलो करतात. इतकंच नाही तर तो अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईतही झाला आहे. परंतु, आता फिट दिसणाऱ्या टायगर एकेकाळी बरंच वजन होतं. त्याने स्वत: हा याचा पुरावा म्हणून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

टायगरने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो प्रचंड जाड दिसत असून अनेक जण थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे या फोटोवर दिशा पटानीसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी कमेंट केल्या आहेत

"माझा एक जुना व्हिडीओ मिळाला, ज्यात मी पहिलं स्किल शिकत आहे..बाबा रे त्यावेळी वाळूमध्ये धावणं कठीण होतं. परंतु, हा खरा स्ट्रगल होता", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, त्याच्या या व्हिडीओवर दिशाने 'हार्ड वर्क' अशी कमेंट केली आहे. तर त्याच्या आईने  kiss इमोजी पोस्ट केल्या आहेत. टायगर त्याच्या फिटनेसकडे कमालीचं लक्ष देतो. वर्क आऊटपासून डाएटपर्यंत तो प्रत्येक गोष्ट नेटाने फॉलो करतो. सध्या तो गणपत या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये बिझी आहे. 

टॅग्स :टायगर श्रॉफसेलिब्रिटीबॉलिवूड