Join us

"माझ्या आयुष्यात एकच दिशा ती म्हणजे..."; टायगरने दिशा पटानीसोबतच्या रिलेशनशीपबाबत दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 14:23 IST

टायगर श्रॉफने थोडक्यात उत्तर देऊन दिशा पाटनीसोबतच्या रिलेशनशीप चर्चांवर मौन सोडलंय (tiger shroff, bade miyan chote miyan, disha patani)

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार 'बडे मिया छोटे मिया' सिनेमामुळे चर्चेत आहेत. 'बडे मिया छोटे मिया' काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने टायगर अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. प्रत्येक मुलाखतीत टायगरला त्याचं दिशा पाटनीसोबत अफेअर आहे का, हे विचारण्यात येतं. अशाच एका मुलाखतीत टायगरला दिशाबद्दल प्रश्न विचारला असता त्याने खास उत्तर देऊन या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत टायगरला प्रश्न विचारण्यात आला की, "तू सिंगल आहेस का? तुझं आयुष्य तुला कोणत्या  दिशेला घेऊन जात आहे." या प्रश्नाचा रोख बघता हा प्रश्न दिशा पाटनीबद्दल विचारण्यात आला होता हे कोणीही सांगू शकेल. टायगरने सुद्धा हुशारीने या प्रश्नाला उत्तर दिलं. टायगर म्हणाला, "माझ्या आयुष्याची एकच दिशा आहे ते म्हणजे माझं काम." अशाप्रकारे टायगरने दिशा पाटनीसोबतच्या अफेअर चर्चांना पूर्णविराम दिला.

टायगर श्रॉफ - अक्षय कुमार यांच्या 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. हा बिग बजेट सिनेमात असून सिनेमात अक्षय कुमार-टायगर श्रॉफ-पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा ११ एप्रिलला सिनेमागृहांत प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या निमित्ताने टायगर- अक्षय यांची तगडी अॅक्शन सिनेमात पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :टायगर श्रॉफअक्षय कुमारदिशा पाटनी