Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानसोबतचा किसिंग सीन शूट करताना करिश्मा कपूरची झाली होती वाईट अवस्था, भर पावसात ३ दिवस सुरु होत शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 16:26 IST

शूटिंग सुरु असताना करिश्मा अक्षरशः कापत होती असे तिने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने लहान वयातच अभिनयाच्या जगात प्रवेश केला. अभिनेत्रीने 1991 मध्ये आलेल्या 'प्रेम कैदी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करिश्मा कपूरचा दुसरा सिनेमा 'पोलिस ऑफिसर' हा होता. दिग्दर्शक डेविड धवनच्या राजा बाबू, अंदाज, कुली नं 1, जुड़वा, हिरो नं. 1, बीवी नं 1, हसीना मान जाएगी, दुल्हन हम ले जाएंगे, चल मेरे भाई यांसारख्या सिनेमामध्ये करिश्मा कपूरने भूमिका साकरल्या आहेत. पण सिनेमा १९९६ साली आलेल्या राजा हिंदुस्तानी या सिनेमाने तिला नवी ओळख मिळवून दिली.  हा सिनेमा त्या काळात बराच हिट झाला. यातील एका किसिंग सीनमुळे सिनेमा बराच चर्चेत आला होता. पण हा किसिंग सीन देताना या सीनचे  करिश्मा अक्षरशः कापत होती.

राजा हिंदुस्तानी चित्रपटातील हा सीन आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आला होता. या सीनचे चित्रीकरण सुरू असताना करिश्मा अक्षरशः कापत होती असे तिने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते. करिश्माने सांगितले होते की, या सीनच्या चित्रीकरणाला आम्हाला तीन दिवस लागले होते. चित्रीकरण फेब्रुवारीत उटीमध्ये झाले होते. त्याकाळात तिथे प्रचंड थंडी असते. थंडीने अक्षरशः मी कापत होते. या सीनचे चित्रीकरण कधी संपेन असे मला झाले होते. कारण प्रचंड थंडी असली तरी आम्ही थंड पाण्यात भिजून या दृश्याचे चित्रीकरण करत होतो. सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सीनसाठी चित्रीकरण करत होतो.

राजा हिंदुस्तानीमधील हा किसिंग सीन जवळजवळ एक मिनिटांचा होता. आताच्या चित्रपटात आपल्याला इतक्या कालावधीचा किसिंग सीन पाहायला मिळतो. पण त्या काळासाठी हा सीन अतिशय बोल्ड मानला गेला होता. राज हिंदुस्तानी या चित्रपटाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या अभिनयाचे तर सगळ्यांनी कौतुक केले होते. या चित्रपटासाठी त्या दोघांना पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटात त्या दोघांशिवाय सुरेश ऑबेरॉय, अर्चना पुरण सिंग, फरिदा जलाल, जॉनी लिव्हर यांच्या मुख्य भूमिका होत्या.

टॅग्स :करिश्मा कपूरआमिर खान