Join us

कोण आहे जया बच्चन यांच्या मिठीत असलेला हा क्यूट मुलगा? वाचाल तर व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 15:26 IST

'कभी खुशी कभी गम' सिनेमातील हा फोटो आहे. पण या मुलाला अनेकांनी ओळखलं नाही. हा फोटो शेअर करून त्यातील मुलाला ओळखण्याचा चॅलेंज दिलं जात आहे. पण पहिल्या नजरेत त्याला ओळखणं अवघड आहे.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. फोटोत एक क्यूट मुलगा दिसत आहे. या मुलाला जया बच्चन यांनी जवळ घेतलं आहे. 'कभी खुशी कभी गम' सिनेमातील हा फोटो आहे. पण या मुलाला अनेकांनी ओळखलं नाही. हा फोटो शेअर करून त्यातील मुलाला ओळखण्याचा चॅलेंज दिलं जात आहे. पण पहिल्या नजरेत त्याला ओळखणं अवघड आहे.

हा मुलगा फारच स्पेशल आहे. हा मुलगा बॉलिवूडच्या किंगचा जीव आहे. आता कदाचित तुम्हाला अंदाज आला असेल की, हा मुलगा कोण आहे. पण यानंतरही तुम्हाला तो ओळखायला आला नसेल तर तो कोण आहे हे आम्ही सांगतो. हा चिमुकला बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खान आहे.

आर्यन खानचा जन्म 13 नोव्हेंबर 1997 ला दिल्लीत झाला होता. बॉलिवूड किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानने साउथ कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातून शिक्षण घेतलं. आर्यन बॉलिवूडमध्ये अजून आला नाही तरीही त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर त्याने 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. आर्यन खानची लहान बहीण सुहाना खान आहे. जी लवकरच एका सिनेमात दिसणार आहे. 

आर्यनला स्पोर्ट्सची आवड आहे आणि त्याने 2010 मध्ये महाराष्ट्र तायक्वांडो स्पर्धेत आणि 2009 मध्ये बेस्ड डबिंग चाइल्ड आर्टिस्टसहीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. फार कमी लोकांना माहीत आहे की, आर्यन खानने करण जोहरच्या कभी खुशी कभी गम सिनेमात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं. तसेच तो शाहरूख खान आणि प्रिती झिंटाच्या कभी अलविदा ना कहना सिनेमातही दिसला होता. त्याला सिनेमातही इंटरेस्ट आहे. त्याला दिग्दर्शक-निर्माता-लेखक व्हायचं आहे.

टॅग्स :आर्यन खानजया बच्चनशाहरुख खानकरण जोहर