Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडची ही अभिनेत्री करणार साऊथमध्ये एन्ट्री, साइन केला वरुण तेजसोबत मोठा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 17:20 IST

३१ वर्षीय बॉलिवूड ब्युटी लवकरच साऊथ स्टार वरुण तेजसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट करण्यास इच्छुक आहेत. यापूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांनी दक्षिणेत पाऊल ठेवले आहे. आता लवकरच आणखी एका बॉलिवूड क्वीनचे नाव जोडले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ३१ वर्षीय बॉलिवूड ब्युटी लवकरच साऊथ स्टार वरुण तेजसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही (Nora Fatehi).

नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी १९९२ रोजी कॅनडामध्ये झाला होता. कॅनेडियन मॉडेल अभिनेत्री दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. तिच्या सौंदर्याची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते. नोराला आता साऊथमध्ये काम करण्याची संधी मिळते आहे. तिला साऊथमधून अनेक ऑफर आल्या होत्या पण बातम्यांनुसार तिने वरुण तेजचा चित्रपट निवडला आहे. 

नोराचा असणार आयटम साँगनोरा फतेहीला वरुण तेजच्या 'VT १४' या शीर्षक नसलेल्या चित्रपटात विशेष भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोराला तिची व्यक्तिरेखा पसंत पडली असून तिने या चित्रपटाद्वारे तेलुगूमध्ये पदार्पण करण्याचे ठरवले आहे. करुणा कुमार 'VT १४' दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात नोराला एक खास व्यक्तिरेखा देण्यात आली आहे. सध्या या चित्रपटाबाबत अंतिम चर्चा सुरू आहे. या चित्रपटात नोराचा एक दमदार डान्स नंबरही असणार असल्याचे वृत्त आहे.

वरुण तेजने यापूर्वी अभिनेत्री लावण्‍या त्रिपाठीसोबत एंगेजमेंट केली होती. आता तो 'VT १४' मध्ये सामील झाला आहे. हा चित्रपट १९६० वर आधारित पीरियड ड्रामा आहे. वरुणचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बजेट चित्रपट असेल. तर २५ ऑगस्टला वरुणचा 'Gandeevadhari Arjuna' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :नोरा फतेही