Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 15:16 IST

Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता यात बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री झाल्याची माहिती मिळत आहे.

अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पा २ (Pushpa 2) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा पहिला भाग इतका हिट झाला होता की आता प्रत्येकजण त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहे. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची क्रेझ एवढी वाढली आहे की आता यात बॉलिवूडचा एक सुपरस्टार दाखल होणार आहे. निर्मात्यांनी या बॉलिवूड स्टारचा समावेश करण्याची योजना आखली आहे. होय, बॉलिवूडचा संजू बाबा पुष्पा २ मध्ये दिसणार आहे.

सियासतच्या रिपोर्टनुसार, संजय दत्त 'पुष्पा २' मध्ये कॅमिओ करणार आहे. रिपोर्टनुसार, संजय दत्तची व्यक्तिरेखा एका प्रभावशाली व्यक्तीची असणार आहे. जे स्टोरी लाईनला एक नवीन लेयर जोडेल. मात्र, निर्मात्यांनी अद्याप संजय दत्तच्या व्यक्तिरेखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. महिन्याभरापूर्वी ईटाइम्सच्या वृत्तानुसार, पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी एका मोठ्या बॉलिवूड स्टारला चित्रपटात सामील करण्याचा निर्णय घेतला होता. या रिपोर्टनंतर मनोज बाजपेयी यांना पुष्पा २ साठी अप्रोच करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर खुद्द मनोज बाजपेयी यांनी ही बातमी चुकीची ठरवली होती.

पुष्पा द राइस २०२१ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट दिग्दर्शक सुकुमार यांनीच लिहिला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि बॉक्स ऑफिसवर बराच काळ चालला. आता त्याच्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू आहे. पुष्पा २ ची रिलीज डेट देखील समोर आली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अल्लू अर्जुनचा लूक व्हायरलपुष्पा २ मधील अल्लू अर्जुनचा लूक समोर आला आहे. यामध्ये तो साडी नेसलेला दिसत होता आणि त्याचा चेहरा निळ्या-लाल रंगाने रंगवला होता. पुष्पा २ मधील फहद फासिलचा लूक देखील समोर आला आहे. आता चाहत्यांना रश्मिका मंदानाच्या लूकची प्रतीक्षा आहे. रश्मिका या चित्रपटात कशी दिसणार हे चाहत्यांना पाहायचे आहे. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनसंजय दत्त