९० च्या दशकातील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. यात काही अभिनेत्री तर अशाही आहेत ज्यांना पहिल्याच सिनेमातून तुफान लोकप्रियता मिळाली. मात्र, ठराविक कालानंतर त्यांचा कलाविश्वातील वावर अचानक कमी झाला आणि त्या इंडस्ट्रीपासून दूर गेल्या. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे पूनम झावर(Poonam Jhawer).
मोहरा या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'ना कजरे की धार, ना मोतियों का हार' हे गाणं आजही अनेकांच्या स्मरणात असेल हे गाणं सुनील शेट्टी(Suniel Shetty) आणि पूनम झावर यांच्यावर चित्रीत झालं होतं. विशेष म्हणजे या गाण्यातून पूनम रातोरात प्रकाशझोतात आली होती. त्यामुळे वाढत्या लोकप्रियतेमुळे तिच्याकडे अनेक सिनेमांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु, काही मोजके सिनेमा केल्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला.
पूनम आज कलाविश्वात फारशी सक्रीय जरी नसली तरीदेखील सोशल मीडियावर तिचा चांगलाच वावर आहे. सध्याच्या घडीला ती तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येत असते. पूनममध्ये पूर्वीपेक्षा बराच बदल झाला आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेली पूनम बऱ्याचदा नेटकऱ्यांसोबत तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.दरम्यान, मोहरा चित्रपटानंतरही ती इतर काही चित्रपटांमध्ये दिसली, यात दीवाना हूं मैं तेरा, आंच, द ब्लॅक अँड व्हाइट फॅक्ट, ओह माय गॉड आणि आर राजकुमार यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
Web Summary : Poonam Jhawer, famed for 'Mohra's' song, gained instant stardom but later disappeared from films. She's now active on social media, known for her bold photos. She appeared in movies like OMG and R Rajkumar.
Web Summary : 'मोहरा' के गाने से मशहूर पूनम झावर अचानक फिल्मों से गायब हो गईं। अब सोशल मीडिया पर बोल्ड फोटोज के लिए जानी जाती हैं। वे 'ओह माय गॉड' और 'आर राजकुमार' जैसी फिल्मों में दिखीं।