Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आज त्यांच्याच सेटवर...'; एकेकाळी डिलिव्हरी बॉयचं काम करायचा 'हा' अभिनेता, आता झळकणार 'फोर्स 3' मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:10 IST

Bollywood actor: अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला आहे.

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात बराच स्ट्रगल केला आहे. यात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्याची चर्चा होतीये. आज बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेला हा अभिनेता एकेकाळी डिलिव्हरी बॉयचं काम करायचा.

सध्याच्या काळात अनेक नवनवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच लवकरत 'फोर्स 3' हा सिनेमा सुद्धा रिलीज होणार आहे. या सिनेमाचं सध्या गुजरातमध्ये चित्रीकरण सुरु असून अभिनेता जॉन अब्राहम या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. जॉनसोबतच या सिनेमात आणखी एक अभिनेता झळकलाय तो म्हणजे हर्षवर्धन राणे.  इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवत असणाऱ्या हर्षवर्धनने सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल केला.

हर्षवर्धनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. या पोस्टमध्ये त्याने एकेकाळी तो डिलिव्हरी बॉयचं काम करायचा असं म्हटलं आहे.

''जगातील सर्वोत्तम निर्माते जॉन अब्राहम यांच्यासाठी काम करतोय. जेव्हा डिलिव्हरी बॉयचं काम करायचो त्यावेळी त्यांचा चाहता होतो. आणि, आज त्यांच्याच सेटवर काम करतोय. ज्या डिलिव्हरी बॉइजला त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. त्यांना एकच सांगेन, कच्च्या रस्त्यावरुन चालणं तुम्हाला मजबूत करतं, वेळेवर डिलिव्हरी करण्याची सवय तुम्हाला शिस्त लावते. उन्हामुळे होणारा उकाडा तुमच्या सहनशिलतेची परीक्षा घेतो. पाऊस तुमच्या हिमतीला आव्हान देतो आणि, लांबचा प्रवास तुमची सीमारेषा तपासते. त्यामुळे तुम्ही फक्त ऑर्डर डिलिव्हर करत नाही तर धैर्य, मेहनत आणि सहनशील बनत आहात'', अशी पोस्ट हर्षवर्धनने लिहिली आहे.

दरम्यान, फोर्स ३ हा अॅक्शन-थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन भव धुलिया करत आहे. या सिनेमात जॉन अब्राहम एसीपी यशवर्धन ही भूमिका साकारत आहे. हा सिनेमा २०२७ मध्ये रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : From Delivery Boy to 'Force 3' Star: Harshvardhan Rane's Journey

Web Summary : Harshvardhan Rane, once a delivery boy, now stars in 'Force 3' with John Abraham. He shared his inspiring journey, highlighting how his past struggles shaped his success and prepared him for Bollywood.
टॅग्स :बॉलिवूडहर्षवर्धन राणेजॉन अब्राहमसेलिब्रिटीसिनेमा