Join us

सिध्दार्थला निरोप देताना 'हे' होते शहनाजचे अखेरचे शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 10:16 IST

Sidharth shukla : अभिनेत्री संभावना सेठ हिने एका मुलाखतीत शहनाजची भावनिक स्थिती नेमकी कशी आहे यावर भाष्य केलं आहे.

ठळक मुद्देसिद्धार्थच्या निधनाचा सगळ्यात जास्त परिणाम अभिनेत्री शहनाज गिलवर झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. यामध्येच सिद्धार्थच्या निधनाचा सगळ्यात जास्त परिणाम अभिनेत्री शहनाज गिलवर झाला. सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त कळल्यापासून शहनाज सातत्याने आसवं गाळत असून सध्या तिची मनस्थिती स्थिर नसल्याचं दिसून येत आहे. त्यातच अभिनेत्री संभावना सेठ हिने एका मुलाखतीत शहनाजची भावनिक स्थिती नेमकी कशी आहे यावर भाष्य केलं आहे. सोबतच सिद्धार्थला निरोप देताना शहनाजने कोणते शब्द उच्चारले हेदेखील तिने सांगितलं आहे. 

शहनाज आणि सिद्धार्थ यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच ठावूक होती. त्यामुळे सिद्धार्थच्या निधनाचं  दु:ख पचवणं शहनाजला कठीण जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शहनाजचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटोंमधून शहनाजच्या भावनिक परिस्थितीचा अंदाज बांधता येतो. त्यात सिद्धार्थला अखेरचा निरोप देताना शहनाजला भावना अनावर झाल्या आणि तिने शेवटी उच्चारलेल्या शब्दांमुळे अनेक जण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

"सिद्धार्थच्या पार्थिवाजवळ ती निस्तेज होऊन बसली होती. आणि, सिद्धार्थला पाहून ती सातत्याने फक्त मेरा बच्चा..सिद्धार्थ मेरा बच्चा, इतकंच बोलत होती. सिद्धार्थच्या पार्थिवाला अग्नी देण्यापूर्वी त्याच्या जवळच्या प्रत्येकाने त्याच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. यावेळी सुद्धा शहनाज त्याच्या पायापाशीच बसून होती. यावेळी झालेल्या सगळ्या विधींमध्ये ती सहभागी होती", असं संभावना सेठ म्हणाली.

सिद्धार्थ-शहनाजचा झाला होता साखरपुडा; डिसेंबरमध्ये बांधणार होते लग्नगाठ?

दरम्यान, संभावना सेठने यावेळी सिद्धार्थच्या आईच्याही भावनिक परिस्थितीवर भाष्य केलं. सिद्धार्थची आई भावनिकदृष्ट्या सातत्याने खंबीर राहण्याचा प्रयत्न करत आहे. पण, हळूहळू एक एक व्यक्ती निघून गेल्यानंतर त्याच्या आईला हा काळ लोटणं अत्यंत कठीण होईल.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाशेहनाझ गिलबॉलिवूडसेलिब्रिटी