Join us

अर्जुन कपूरसोबत लग्न करत नाहीये Malaika Arora! जाणून घ्या, लाजून कुणाला दिला होकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 18:45 IST

मलायका अरोराने आता स्वतःच या रहस्यावरून पडदा बाजूला केला आहे. तिने म्हटले आहे, की आपण अर्जुन कपून नव्हे, तर दुसऱ्या कुणाला तरी हो म्हटले आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यासंदर्भात नेहमीच चर्चा होत असते. या दोघांची जोडी बॉलिवूडमधील काही चर्चित कपल्सपैकी एक आहे. मलायका आणि अर्जुन यांनी लग्न करावे असे त्यांच्या चाहत्यांनाही वाटते. या दोघांच्या लग्नासंदर्भातील बातम्याही नेहमीच येत असतात. अशातच मलायका अरोराने 'हो' म्हटल्यासंदर्भात एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली. यावर अनेक युजर्सना वाटले, की आता हे दोघे लग्न बंधनात अडक आहेत. मात्र, आता सत्य समोर आले असून काहाणी काही औरच आहे. 

मलायका अर्जुनला नव्हे, यांना म्हणाली आहे 'हो' -मलायका अरोराने आता स्वतःच या रहस्यावरून पडदा बाजूला केला आहे. तिने म्हटले आहे, की आपण अर्जुन कपून नव्हे, तर दुसऱ्या कुणाला तरी हो म्हटले आहे. ती व्यक्ती डिस्ने प्लस हॉटस्टारची टीम आहे. खरे तर मलायका अरोरा आपला एक रिअॅलिटी शो घेऊन येत आहे. या शोचे नाव आहे, 'मूव्हिंग विथ मलायका'. 

आपल्या रिअॅलिटी शोची घोषणा करताना मलायका अरोरा म्हणाली, 'मी डिस्ने प्लस हॉटस्टारला 'हो' म्हटले आहे, माझ्या नव्या रिअॅलिटी शो, हॉटस्टार स्पेशल मूविंग विद मलायकासाठी. यात आपण मला अगदी जवळून बघाल आणि पर्सनली जाणून घेऊ शकाल, जे यापूर्वी कधीही झाले नाही. एक मिनट, आपल्याला काय वाटत होते? 5 डिसेम्बरपासून हा शो स्ट्रीम होईल.'

इन्स्टाग्राम पोस्टमुळे आले होते चर्चांना उधाण - खरे तर, यापूर्वी मलायका अरोराने इंस्टाग्रामवर लाजतानाचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, मी होकार दिला आहे. मलायकाची ही पोस्ट पाहून चाहते हैराण झाले होते. ते तर्क-वितर्क लावताना दिसत होते. खरेच मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची ही हिंट आहे, की प्रमोशनल स्ट्रॅटेजी? असे तर्क लावले जात होते. कारण यापूर्वीही काही कलाकारांनी अशा पद्धतीने आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशन्ससाठी वापर केला आहे. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरइन्स्टाग्रामबॉलिवूड