२०२२ मध्ये एक सिनेमा आला. ज्या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. रहस्यमयी थ्रिलर कथानकामुळे या सिनेमाने रिलीज झाल्या झाल्याच प्रेक्षकांची पसंती मिळवली. प्रमुख कलाकारांच्या दमदार अभिनयाने या सिनेमाला चार चाँद लागले. आता तब्बल ४ वर्षांनी याच सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाचं नाव आहे 'वध २'.
आता 'वध' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित दुसरा भाग म्हणजेच 'वध २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यात सस्पेन्स आणि थ्रिलरचा जबरदस्त डोस पाहायला मिळत आहे.
ट्रेलरमध्ये काय आहे खास?
'वध २' चा ट्रेलर एका अशा वळणावर सुरू होतो जिथे संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी साकारलेली पात्रे एका नव्या संकटात सापडलेली दिसतात. ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार, यावेळी गुन्ह्याची पार्श्वभूमी बदलली आहे. तुरुंगाच्या आत एका कैद्याचा खून होतो, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा मृतदेह शोधूनही सापडत नाही. पोलीस तपास करतात. यावेळी संजय मिश्रा यांच्या पात्रावर संशय घेतला जातो. संजय निर्दोष आहेत असं वरवर वाटत असलं तरी ते आपल्या शांत आणि साध्या स्वभावामागे काहीतरी भयंकर लपवत असल्याचे जाणवते.
संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. एका मध्यमवर्गीय दांपत्याचे आयुष्य आणि त्यांच्या हातून घडलेल्या एका गुन्ह्याचे परिणाम या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या जिवंत अभिनयामुळे ट्रेलर एका वेगळ्याच उंचीवर जातो. 'वध २' सिनेमा ६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Summary : The sequel to the acclaimed thriller 'Vadh,' starring Sanjay Mishra and Neena Gupta, is set to release after four years. The trailer of 'Vadh 2' showcases suspense and thrills, with Mishra's character suspected in a prison murder where the body vanishes. Releasing February 6th.
Web Summary : संजय मिश्रा और नीना गुप्ता अभिनीत प्रशंसित थ्रिलर 'वध' का सीक्वल चार साल बाद रिलीज होने के लिए तैयार है। 'वध 2' का ट्रेलर सस्पेंस और रोमांच दिखाता है, जिसमें मिश्रा का किरदार जेल में एक हत्या में संदिग्ध है जहां शव गायब हो जाता है। 6 फरवरी को रिलीज हो रही है।