Join us

"या जगातील सर्वात मूर्ख लोक"; आलियाला 'नेपो किड' म्हणणाऱ्यांवर करण जोहर चांगलाच भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:47 IST

करण जोहरने आलिया भटला नेपो किड म्हणणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. याशिवाय आलियाच्या अभिनयाचंही कौतुक केलं

आलिया भट (alia bhat) ही बॉलिवूडमधील सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री. आलियाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर आलियाने खूप प्रेम मिळवलं असलं तरीही आजही नेपोटिझमच्या नावाखाली आलियाला टीका सहन करावी लागते. यामुळेच चित्रपट निर्माते करण जोहरने (karan johar) अलीकडेच आलिया भट्टला 'नेपो किड' म्हणणाऱ्या ट्रोल्सवर जोरदार टीका केली आहे. त्याने अशा टीकाकारांना "या जगातील सर्वात मूर्ख लोक" असे संबोधलं आहे. काय म्हणाला करण जोहर जाणून घ्या.

आलियाला नेपो किड म्हणणाऱ्यांना करणने सुनावलं

करण जोहरने आलियाची बाजू घेत सांगितलं की, "तुम्ही 'हायवे', 'उडता पंजाब', 'राजी', 'गंगूबाई काठियावाडी' हे चित्रपट पाहिले आहेत का? तिच्या फिल्मोग्राफीकडे एकदा पाहा. जर तुम्ही अजूनही तिला 'नेपो किड' म्हणत असाल, तर तुम्ही या ग्रहावरील सर्वात मूर्ख व्यक्ती आहात, आणि कोणीही तुमची मदत करू शकत नाही." 

करणने आलियाच्या अभिनय कारकिर्दीचा उल्लेख करताना तिच्या विविध भूमिकांमधील उत्कृष्ट कामगिरीचे उदाहरण दिले. 'हायवे'मध्ये तिने एका अपहरण झालेल्या मुलीची भूमिका साकारली होती, 'उडता पंजाब'मध्ये एका बिहारी स्थलांतरित मजुराची, 'राजी'मध्ये भारतीय गुप्तहेराची, आणि 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये एका वेश्या व्यवसायातील महिलेची भूमिका साकारली होती. या सर्व चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचे समीक्षकांनीही कौतुक केले आहे.

करण जोहरने आलियाला 'स्टुडंट ऑफ द इयर' (२०१२) या चित्रपटातून लाँच केले होते.  करण आलियाला आपली 'गॉड चाईल्ड' मानतात. करणने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "ती माझ्यासाठी पहिली व्यक्ती आहे जिच्याबद्दल मला पालकत्वाची भावना आली." या विधानांद्वारे करण जोहरने आलिया भटच्या अभिनयाचं कौतुक करताना, केवळ तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे तिच्या यशाला 'नेपोटिझम'चे लेबल लावणे अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :करण जोहरआलिया भटबॉलिवूड