Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 18:44 IST

अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयत दाखल, जाणून घ्या तिच्या प्रकृतीबद्दल

'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी(१ ऑगस्ट) अदाची तब्येत अचानक बिघाडल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार, अदा शर्माला फूड अॅलर्जी झाल्यामुळे तिची प्रकृती बिघडली आहे. अपचनाचा त्रास झाल्यामुळे अदाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 

मंगळवारी सकाळी अचानक अदा शर्माची प्रकृती बिघडली. तिला उलट्या आणि अपचनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिला अशक्तपणा आला होता. त्यानंतर ताबडतोब अदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती तिच्या जवळच्या व्यकीने दिली आहे. अदा शर्माच्या काही टेस्टही करण्यात आल्या आहेत. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला रुग्णालयातच ठेवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

दिल्लीहून मुंबईला आले, रात्री १० वाजता खोलीत गेले अन्...; नितीन देसाईंच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं?

'लगान' चित्रपटाचं शूटिंग करताना वडिलांना कॅन्सर झाल्याचं कळलं अन्...; नितीन देसाईंनी शेअर केलेला भावनिक प्रसंग

'द केरला स्टोरी' चित्रपटानंतर अदा शर्मा 'कमांडो' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये ती 'भावना रेड्डी' हे पात्र साकारताना दिसणार आहे. अदा शर्मा 'कमांडो'मध्ये अॅक्शन सीनही करताना दिसणार आहे. तिच्यासह या सीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी, श्रीया सिंह चौधरी, मुकेश छाबरा, अमित सियाल हे कलाकारही दिसणार आहेत. 

टॅग्स :अदा शर्माबॉलिवूड