Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड अभिनेत्रीने खरेदी केलं सुशांत सिंह राजपूत राहत असलेलं घर, अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर रिकामा होता फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 18:23 IST

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेल्या ‘त्या’ फ्लॅटची विक्री, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री खरेदी केलं घर

‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर आजही चाहते तितकंच प्रेम करतात. ‘एम,एस.धोनी’, ‘काय पोछे’ यांसारख्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मनं जिकंली होती. २०२० साली त्याने आत्महत्या करत जीवन संपवलं. मुंबईतील राहत्या घरी सुशांतने गळफास घेतला होता. त्याच्या आत्महत्येने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. ज्या फ्लॅटमध्ये सुशांतने आत्महत्या केली तिथे तो भाड्याने राहत होता. त्याच्या आत्महत्येनंतर हा फ्लॅट रिकामाच होता. आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने हा फ्लॅट खरेदी केल्याचं वृत्त आहे.

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतचा मुंबईतील फ्लॅट खरेदी केला आहे. ‘टेली चक्कर’ने दिलेल्या माहितीनुसार, अदा शर्माने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतचा हा दोन मजली फ्लॅट विकत घेतला आहे. अभिनेत्रीच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अदा शर्मा या फ्लॅटमध्ये कधी शिफ्ट होईल याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा फ्लॅट रिकामीच होता. सुशांतच्या मृत्यूनंतर या फ्लॅटचं भाडेही वाढविण्यात आलं होतं. अनेकांनी हा फ्लॅट खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. अखेर अदा शर्माने हा फ्लॅट आता खरेदी केला आहे.

लग्नाआधी परिणीती चोप्रा-राघव चड्ढा महादेवाच्या दर्शनाला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मलायकाबरोबर ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुनच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष, म्हणाला, “या जगात फक्त...”

दरम्यान, मुंबईमधील या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी सुशांतला लाखो रुपये मोजावे लागत होते. या फ्लॅटचं एका महिन्याचं भाडं तब्बल ४.५ लाख इतकं होतं, अशी माहिती आहे. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर हा फ्लॅटही चर्चेत आला होता.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअदा शर्माबॉलिवूडसेलिब्रिटी