The Kerala Story 2 Trailer : २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या The Kerala Story या चित्रपटाची देशभरात मोठी चर्चा झाली होती. आता या चित्रपटाचा पुढचा भाग The Kerala Story 2: Goes Beyond लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात धर्मांतर आणि फसवणुकीच्या धक्कादायक कथा मांडण्यात आल्या आहेत. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यातील काही दृश्ये आणि संवाद प्रेक्षकांना हादरवून सोडणारे आहेत.
"येत्या २५ वर्षांत संपुर्ण भारत इस्लामिक राष्ट्र होईल" या वाक्यानं ट्रेलरची सुरुवात होते. ३ मिनिटे ४ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ या तीन राज्यांतील तीन वेगवेगळ्या मुलींची व्यथा मांडण्यात आली आहे. ट्रेलरमधील काही दृश्ये प्रेक्षकांना सुन्न करणारी आहेत. विशेषतः एका दृश्यात हिंदू मुलीला जबरदस्तीने गोमांस खायला दिले जात असल्याचे दाखवले आहे.
प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शनया चित्रपटाचे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले असून, विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा या तीन मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत आहेत. या तिघीही तीन मुस्लिम तरुणांच्या प्रेमात पडतात आणि त्यानंतर त्यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते, याचे चित्रण यात आहे. हा बहुचर्चित चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : "The Kerala Story 2" trailer released, depicting forced conversions and deception. The film portrays the plight of three girls from Rajasthan, Madhya Pradesh and Kerala, highlighting forced religious practices. Directed by Kamakhya Narayan Singh, it releases February 27, 2026.
Web Summary : "द केरला स्टोरी 2" का ट्रेलर जारी, धर्मांतरण और धोखे को दर्शाया गया है। फिल्म राजस्थान, मध्य प्रदेश और केरल की तीन लड़कियों की दुर्दशा को दर्शाती है, जो जबरन धार्मिक प्रथाओं पर प्रकाश डालती है। कामाख्या नारायण सिंह द्वारा निर्देशित, यह 27 फरवरी, 2026 को रिलीज होगी।