'द केरळ स्टोरी २: गोज बियाँड' हा विपुल शाह निर्मित सिनेमा मोठ्या वादानंतर शुक्रवारी प्रदर्शित झाला. आधी सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती मिळाली होती. मात्र नंतर केरळ उच्च न्यायालयाने मेकर्सला दिलासा देत स्थगिती हटवली. सिनेमाा् चित्रपटगृहात आला आहे की नाही याबाबत प्रेक्षकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाल्याने पहिल्या दिवशी सिनेमाने केवळ ७५ लाख रुपयांची कमाई केली. मात्र शनिवार-रविवारी वीकेंडला सिनेमाने मोठी झेप घेतली.
सॅकनिल्कच्या (Sacnilk) आकडेवारीनुसार, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने ४.६५ कोटींची कमाई केली, तर रविवारी हा आकडा ५ कोटींच्या आसपास गेला. यामुळे पहिल्या वीकेंडची एकूण कमाई तब्बल १०.४० कोटींवर पोहोचली आहे. जर पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरुवात चांगली झाली असती, तर हा आकडा १५ कोटींच्या पुढे गेला असता, असा अंदाज वर्तवण्यात आला. चित्रपटाचं एकूण बजेट २८ ते ३० कोटींच्या घरात असल्याने १०.४० कोटींची कमाई समाधानकारक मानली जात आहे. तरी आता सोमवारपासून 'वीक डेज'मध्ये सिनेमा किती कमावतो यावर सिनेमा हिट की फ्लॉप ते ठरेल.
कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाला केरळमधून मोठा विरोध झाला आणि शो रद्द झाल्यामुळे सुरुवातीच्या कमाईवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
'द केरळ स्टोरी २' ने वीकेंडला पकड मिळवली असली तरी, तो पहिल्या भागाचा विक्रम मोडू शकलेला नाही. २०२३ साली आलेल्या 'द केरळ स्टोरी'ने पहिल्या वीकेंडला ३५.४३ कोटींची तगडी कमाई केली होती. यामध्ये अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली होती.
Web Summary : Despite initial setbacks and controversy, 'The Kerala Story 2' rebounded strongly over the weekend, earning ₹10.40 crore. While less than the first film, the collection is considered satisfactory given the budget. The film's success hinges on weekday performance.
Web Summary : विवादों और शुरुआती बाधाओं के बावजूद, 'द केरल स्टोरी 2' ने वीकेंड पर ₹10.40 करोड़ की कमाई की। पहले फिल्म से कम होने पर भी, बजट को देखते हुए संग्रह संतोषजनक माना जाता है। फिल्म की सफलता अब सप्ताह के दिनों के प्रदर्शन पर निर्भर करती है।