Join us
Daily Top 2Weekly Top 5

हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन ३ लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 10:42 IST

कपिल शर्मा पुन्हा सज्ज! 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या तिसऱ्या सीझनची घोषणा

लोकप्रिय कॉमेडियन 'कपिल शर्मा' (Kapil Sharma) हा नेहमीच चर्चेत राहतो. त्याच्या  कॉमेडीचे लाखो चाहते आहेत. टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'मधून घराघरांत पोहोचलेला कपिल आता नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या माध्यमातून नव्याने प्रेक्षकांना हसवतोय. या शोचे आतापर्यंत दोन यशस्वी सीझन पार पडले असून आता तिसऱ्या सीझनची (The Great Indian Kapil Sharma Show Season 3) अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

नेटफ्लिक्सकडून काल २४ मे रोजी एक धमाकेदार प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. प्रोमोची सुरुवात कपिलच्या एका फोन कॉलने होते. तो अर्चना पूरण सिंगला फोन करतो, तेव्हा अर्चना सांगतात की त्या सध्या बँकेत असून कर्ज घेण्यासाठी आल्यात. त्यावर कपिल मिश्कीलपणे म्हणतो, "कर्ज घेऊ नका, आपल्या शोचा तिसरा सीझन येतोय". त्यानंतर कपिल आपल्या टीममधील किकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोव्हर यांनाही फोन करतो.  यावेळी तिसऱ्या सीझनमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी प्रोमो पाहून बांधलाय.

हा नवीन सीझन येत्या २१ जून २०२५ पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. या शोचा दुसरा सीझन २१ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू झाला होता आणि १४ डिसेंबर २०२४ रोजी समाप्त झाला. सुमारे सहा महिन्यांनंतर कपिल शर्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये बॉलिवूड, संगीत आणि क्रिकेटमधील काही दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. आता सिझन ३ मध्ये कोणते सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दिसणार हे पाहणे मनोरंजक असेल. The Great Indian Kapil हा शो १९२ देशांमध्ये टेलीकास्ट होत आहे.

टॅग्स :कपिल शर्मा नेटफ्लिक्सअर्चना पूरण सिंगसुनील ग्रोव्हर