बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) सध्या 'छावा' (Chhaava Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका साकारली असून या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. अक्षय खन्ना बराच काळ इंडस्ट्रीपासून दूर होता, त्याने अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान अक्षय खन्ना त्याच्या गळणाऱ्या केसांबद्दल सांगितले.
मिड डेला दिलेल्या मुलाखतीत अक्षय खन्नाने सांगितले की, वयाच्या १९-२० व्या वर्षी त्याचे केस गळायला लागले होते. त्यामुळे त्याच्या टाळूवर टक्कल पडू लागले. अक्षय खन्ना जेव्हा आरशात स्वतःला पाहतो तेव्हा त्याला खूप वाईट वाटायचे. तो म्हणाला की, पियानो वादकाची बोटे तुटल्यावर त्याला जसे वाटेल तसे मला वाटते. चित्रपट कारकिर्दीबाबत तो म्हणाला की, या इंडस्ट्रीत चांगले दिसणे, विशेषतः सुंदर चेहरा असणे खूप गरजेचे आहे, जर तुमच्याकडे चेहरा नसेल तर तुम्ही हिरो बनू शकत नाही. यामुळे, मी अनेक प्रकल्पांना मुकलो, यामुळे मला खूप त्रास झाला. ते हृदय पिळवटून टाकणारे होते.
''माझ्या आत्मविश्वासावर...''
जेव्हा अक्षय खन्नाला विचारण्यात आले की, त्याने टक्कल लपवण्यासाठी प्रयत्न केला होता का?, त्यावर अक्षय म्हणाला की, या प्रकरणात प्रत्येकाची निवड असते. एक तरुण अभिनेता असल्यामुळे टक्कल पडल्यावर माझ्या आत्मविश्वासावर जास्त प्रभाव झाला.
वर्कफ्रंटअक्षय खन्ना सध्या 'छावा' सिनेमात औरंगजेबच्या भूमिकेत पाहायला मिळतो आहे. या सिनेमातील त्याचा लूक, अभिनय आणि डायलॉग डिलिव्हरीचे खूप कौतुक होत आहे. अभिनेता बराच काळ लाइमलाइटपासून दूर होता. मात्र नंतर त्याला एकापेक्षा एक दमदार प्रोजेक्ट मिळत गेले. तो दृश्यम २मध्येही पाहायला मिळाला होता. त्यानंतर तो 'आर्टिकल ३७०'मध्येही झळकला होता.