Join us

“ते वन नाइट स्टँड...”, ऋषी कपूर यांच्या लग्नानंतरच्या अफेअर्सबाबत नीतू कपूर यांनी केलेला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 14:20 IST

लग्नानंतरही ऋषी कपूर यांचे अफेअर्स असल्याचा खुलासा नीतू कपूर यांनी एका मुलाखतीत केला होता.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ‘दीवार’, ‘कभी कभी’, ‘याराना’ या चित्रपटांतून ७०चं दशक गाजवलेल्या नीतू कपूर यांनी १९८० साली ऋषी कपूर यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर नीतू कपूर कलाविश्वापासून दूर होत्या. ऋषी कपूर त्यांच्या अभिनयाप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असायचे. ऋषी कपूर यांचे लग्नानंतरही अनेक अफेअर्स असल्याचा खुलासा नीतू कपूर यांनी एका मुलाखतीत केला होता.

“मी त्यांना अनेकदा फ्लर्ट करताना पकडलं आहे. त्यांच्या अफेअरबाबत सगळ्यात आधी मला माहीत असायचं. पण, ते केवळ वन नाइट स्टँड असल्याचे मला माहीत होते. काही वर्षांपूर्वी या गोष्टीवरुन आमच्याच वादही व्हायचे. पण त्यानंतर मी ही गोष्ट स्वीकारण्याचं आणि सगळं सोडून देण्याचं ठरवलं. आम्हाला एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास होता. त्यांच्यासाठी कुटुंब सर्वकाही आहे, हे मला माहीत होतं. त्यामुळे मी कधीच चिंता केली नाही,” असं त्या म्हणाल्या होत्या.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्ट शेअर करत म्हणाली...

पुढे त्यांनी “ऋषी कपूर माझ्यावर अवलंबून होते आणि ते कधीच मला सोडून जाणार नाहीत, हे मला माहीत होतं. पुरुषांना थोडं फार स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं. ते नैसर्गिकरित्याच तसे आहेत,” असंही सांगितलं होतं.

इलियाना डिक्रुझचा मिस्ट्री मॅन आला समोर; अभिनेत्रीने दाखवली बॉयफ्रेंडची पहिली झलक

ऋषी कपूर व नीतू कपूर यांना रिधिमा व रणबीर कपूर ही दोन मुले आहेत. लग्नानंतर नीतू कपूर गंगा मेरा मां  चित्रपटात शेवटच्या दिसल्या होत्या. त्यानंतर त्या पडद्यापासून दूर होत्या. २००९ मध्ये त्यांनी कलाविश्वात पुनरागमन केलं. त्यानंतर त्या ‘जब तक है जान’, ‘बेशरम’, ‘स्पेशल २६’ आणि ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

टॅग्स :ऋषी कपूररणबीर कपूरबॉलिवूडनितू सिंग