धनुष आणि क्रिती सेनन यांचा आगामी 'तेरे इश्क मे' सिनेमाची चर्चा आहे. आनंद एल राय दिग्दर्शित हा सिनेमा प्रेम आणि विरहाची कहाणी आहे. या सिनेमाचा काही महिन्यांपूर्वी फर्स्ट लूक आला होता. धनुष आणि क्रितीची सिझलिंग केमिस्ट्री यामध्ये दिसली. अनेकांना 'रांझणा'चीच आठवण झाली. मात्र हा रांझणाचा सीक्वेल नाही. आता नुकतंच सिनेमाच्या सेटवरुन धनुषचे काही फोटो लीक झाले आहेत.
वायू दलाच्या वर्दीत धनुषचा फोटोसमोर समोर आला आहे. वर्दीवर शंकर असं नाव लिहिलं आहे. यावरुन धनुष वायू दलाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल असा अंदाज आहे. आर्मी हेअर, मिशी असा त्याचा एकंदर गेटअप आहे. धनुष शंकर तर क्रिती सेनन मुक्तीच्या भूमिकेत आहे. धनुषचा हा फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'तेरे इश्क में'च्या टीझरमध्ये दिसतं की, शहरात दंगल पेटलेली असते. लोकं सैरावैरा धावत असतात. पोलीस सर्वांना नियंत्रणात आणत असतात. अशातच क्रिती सनॉनचा बॅकग्राउंडला आवाज दिसतो. कवितेच्या टोनमध्ये क्रिती संवाद म्हणताना दिसते. शेवटी ती स्वतःच्या अंगावर रॉकेलचं कॅन रिकामं करते. शेवटी तोंडात सिगारेट पेटवून क्रिती लायटर पेटवते तोच भडका उठतो.
आनंद एल.राय दिग्दर्शित 'तेरे इश्क में' सिनेमा २८ नोव्हेंबर २०२५ ला रिलीज होणार आहे. याशिवाय आनंद एल. राय, हिमांशू शर्मा यांच्यासोबत T Series चे भूषण कुमार, क्रिशन कुमार यांनी या सिनेमाची निर्मिती केलीय. आनंद एल. राय आपल्या सर्वांना माहितच आहेत. त्यांनी 'रांझणा', 'तनू वेड्स मनू', 'तनू वेड्स मनू रिटर्न' असे सिनेमे दिग्दर्शित केले. इतकंच नव्हे मराठीतील 'झिम्मा २', 'फसक्लास दाभाडे' या सिनेमांची निर्मितीही आनंद एल. राय यांनी केलीय. त्यामुळे 'तेरे इश्क में' सिनेमातून धनुष-क्रितीच्या साथीने आनंद एल.राय कशी जादू करतात, हे पाहायचं आहे.