Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! अंगावर रॉकेल अन् हातात सिगारेट; क्रिती-धनुषच्या 'तेरे इश्क में'चा थरारक टीझर, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:06 IST

धनुष आणि क्रिती सनॉन या नव्या जोडीचा 'तेरे इश्क में' सिनेमाचा पहिला टीझर रिलीज झालाय. बातमीवर क्लिक करुन नक्की बघा

काल धनुषची भूमिका असलेल्या 'तेरे इश्क में' सिनेमाचा पहिला टीझर रिलीज झाला. या टीझरमध्ये धनुष धावत येऊन एका भिंतीवर हातातली रॉकेलची बाटली जोरात मारतो आणि त्या भिंतीला आग लागते. काल या टीझरमध्ये बॅकग्राऊंडमध्ये एका अभिनेत्रीचा आवाज ऐकू आला. त्यामुळे 'तेरे इश्क में' (tere ishq mein teaser) सिनेमात अभिनेत्री कोण झळकणार,  याचा उलगडा आज होणार होता. अखेर त्याचा खुलासा झाला असून 'तेरे इश्क में' सिनेमात क्रिती सनॉन (kriti sanon) दिसणार आहे.

'तेरे इश्क में'चा टीझर

'तेरे इश्क में'च्या टीझरमध्ये दिसतं की, शहरात दंगल पेटलेली असते. लोकं सैरावैरा धावत असतात. पोलीस सर्वांना नियंत्रणात आणत असतात. अशातच क्रिती सनॉनचा बॅकग्राउंडला आवाज दिसतो. कवितेच्या टोनमध्ये क्रिती संवाद म्हणताना दिसते. शेवटी ती स्वतःच्या अंगावर रॉकेलचं कॅन रिकामं करते. शेवटी तोंडात सिगारेट पेटवून क्रिती लायटर पेटवते तोच भडका उठतो. पुढे क्रिती सनॉन कोणती भूमिका साकारणार याचा खुलासा होतो. क्रिती 'तेरे इश्क में' सिनेमात मुक्तीची भूमिका साकारणार आहे.

कधी रिलीज होणार 'तेरे इश्क में'?

आनंद एल.राय दिग्दर्शित 'तेरे इश्क में' सिनेमा २८ नोव्हेंबर २०२५ ला रिलीज होणार आहे. याशिवाय आनंद एल. राय, हिमांशू शर्मा यांच्यासोबत T Series चे भूषण कुमार, क्रिशन कुमार यांनी या सिनेमाची निर्मिती केलीय. आनंद एल. राय आपल्या सर्वांना माहितच आहेत. त्यांनी 'रांझणा', 'तनू वेड्स मनू', 'तनू वेड्स मनू रिटर्न' असे सिनेमे दिग्दर्शित केले. इतकंच नव्हे मराठीतील 'झिम्मा २',  'फसक्लास दाभाडे' या सिनेमांची निर्मितीही आनंद एल. राय यांनी केलीय. त्यामुळे 'तेरे इश्क में' सिनेमातून धनुष-क्रितीच्या साथीने आनंद एल.राय कशी जादू करतात, हे पाहायचं आहे. 

टॅग्स :धनुषक्रिती सनॉनबॉलिवूड