धनुष आणि क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेला 'तेरे इश्क में' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. 'तेरे इश्क में'ची रिलीजआधीपासूनच खूप चर्चा होती. अशातच 'तेरे इश्क में' सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढत आहे. सिनेमाने गेल्या सहा दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. इतकंच नव्हे हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या.'तेरे इश्क में' सिनेमाने किती पैसे कमावले?प्रेक्षक आणि समीक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे 'तेरे इश्क में' सिनेमाने तिकिट खिडकीवर भरघोस कमाई केली आहे. क्रिती-धनुषच्या या हृदयस्पर्शी कहाणीने पहिल्या दिवशी १६ कोटींची कमाई केली. परंतु नंतर मात्र कमाईत चांगलीच घट झाली. तरीही पाचव्या दिवशी 'तेरे इश्क में' सिनेमाने १०.२५ कोटींची कमाई केली. सिनेमाने सहाव्या दिवशी बुधवारी ६.७५ कोटींची कमाई केली. त्यामुळे सहा दिवसांमध्ये 'तेरे इश्क में' सिनेमाने एकूण ७६.७५ कोटींची कमाई केली. लवकरच हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेण्याची शक्यता आहे.
Web Summary : Dhanush and Kriti Sanon's 'Tere Ishq Mein' is performing well at the box office. The film has earned ₹76.75 crore in six days and is expected to enter the ₹100 crore club soon. It faces competition from 'Dhurandhar'.
Web Summary : धनुष और कृति सेनन की 'तेरे इश्क में' बॉक्स ऑफिस पर अच्छा प्रदर्शन कर रही है। फिल्म ने छह दिनों में ₹76.75 करोड़ कमाए और जल्द ही ₹100 करोड़ के क्लब में प्रवेश करने की उम्मीद है। इसे 'धुरंधर' से प्रतिस्पर्धा का सामना करना पड़ रहा है।