Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: सौंदर्या शर्माच्या 'बॉम्ब है'चा टीझर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 18:46 IST

Soundarya Sharma: या गाण्यात अभिनेत्री सौंदर्या शर्मा झळकली असून हा टीझर अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.

प्रसिद्ध रॅपर राका (Rapper Raka) याचं 'बॉम्ब है' या आगामी हिप-हॉप गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या गाण्यात अभिनेत्री सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) झळकली असून हा टीझर अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.  सध्या सोशल मीडियावर हा टीझर व्हायरल होतांना दिसत आहे.श्रोत्यांसाठी काही तरी नवीन

"श्रोत्यांसाठी काही तरी नवीन घेऊन येण्याची आमची योजना होती. ज्यामुळे पार्टी असो वा अन्य कार्यक्रम ज्यामुळे हे गाणं ऐकल्यावर प्रत्येकाचा उत्साह वाढेल. त्यामुळे या टीझरनंतर पूर्ण गाणं ऐकल्यानंतर लोकांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे", असं राका म्हणाला.

"२०२१ वर्ष संपायला अवघे काही महिने बाकी आहेत. त्यामुळे वर्षाच्या शेवटी अनेक जण पार्टीचं आयोजन करत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या पार्टीची रंगत वाढेल असंच हे गाणं आहे. गोव्यात ज्या पद्धतीने या गाण्याचं चित्रीकरण झालंय ते आमच्यासाठी खरंच एका पार्टीचा फिल देणारा अनुभव होता", असं सौंदर्या म्हणाली.

दरम्यान, अभिनेत्री सौंदर्यावर चित्रीत करण्यात आलेल्या बॉम्ब है या हिप-हॉप सॉन्गचं गोव्यात चित्रीकरण करण्यात आलं आहे.  पॅनोरमा म्युझिकने याची निर्मिती केली असून राकाने ते गायलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन