Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभास आणि श्रद्धाचा 'साहो' कधी रिलीज होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 17:35 IST

प्रभासच्या साहोमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार असून या जोडीची केमिस्ट्रीही उत्सुकता ताणून आहे.

मुंबई : 'बाहुबली' फेम प्रभास याच्या आगामी 'साहो' सिनेमाची उत्सुकता ताणली गेली आहे. हा सिनेमा कधी रिलीज होणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. कारण या सिनेमात प्रभास  वेगळ्या अंदाजात बघायला मिळणार आहे. आता लवकरच या सिनेमाचे निर्माते रिलीज डेट जाहीर करणार असल्याचं समजतं. 

प्रभासच्या साहोमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार असून या जोडीची केमिस्ट्रीही उत्सुकता ताणून आहे. याआधी या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, टीम 'साहो' ला वाटतंय की, हा सिनेमा पुढील वर्षी एप्रिलमध्ये रिलीज केला जावा. पण अजून डेट फायनल झाली नाहीये. पण निर्मात्यांचा हाच प्रयत्न असेल की, हा सिनेमा एप्रिल महिन्यात रिलीज व्हावा.

'बाहुबली'च्या जबरदस्त यशानंतर प्रभासच्या खांद्यावर अपेक्षांचं ओझं आणखीन वाढलं आहे. १५० कोटी रूपये खर्च करून तयार केला जाणारा हा सिनेमा हिंदीसोबतच तेलगु आणि तमिळ भाषेतही रिलीज केला जाणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूड